शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

देवाची दया नव्हे, तर चोराची माया; महिलेच्या 'गुगल पे'वर अचानक आले ६०,०००, मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 09:51 IST

वचपा काढण्यासाठी महिलेच्या खात्यात रक्कम केली ‘गुगल पे’

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : बँक खात्यात अचानक ६० हजार रुपये आल्याने घाटकोपरमधील महिला हुरळून गेली. देवाची आपल्यावर दया झाली असे काहीसे वाटल्याने त्यातील काही पैसे तिने खर्चही केले. मात्र दुसऱ्याच दिवशी कुर्ला रेल्वे पोलिसांनी तिचे दार ठोठावले आणि तो चोरीचा पैसा असल्याचे तिला समजले. ते पैसे एका चोराने वचपा काढण्यासाठी चोरीच्या मोबाइलवरून गुगल पे केले होते. मात्र पोलिसांनी तपास करत खरा प्रकार उघड करत आरोपीला अटक केली.

साहिल सईद कुरेशी (२२) असे अटक आरोपीचे नाव असून तो घाटकोपरमधील नित्यानंद नगरमध्ये राहतो. त्याच्या मित्राच्या घरी महिनाभरापूर्वी चोरी झाली होती. या प्रकरणात पीडितेने तिघांवर आरोप केला. यात कुरेशीचा समावेश होता. त्यानुसार अभिलेखावरील आरोपी कुरेशीला चिरागनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. पण काहीच निष्पन्न न झाल्याने त्याला सोडून दिले. याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. दरम्यान घाटकोपर रेल्वे स्थानकावर तो फिरत असताना सावला (२७) नावाच्या व्यक्तीचा मोबाइल त्याने चोरला. सावलाने जेव्हा त्याने कुरेशीला फोन परत करण्याची विनंती केली. तेव्हा त्याने फोन तुझाच आहे यावर कसा विश्वास ठेवू? तू मला मोबाइलचा पिन दे म्हणजे ते सिद्ध होईल असे सांगितले. तसेच मोबाइल परत  देण्यासाठी सावलाना ठाण्याला भेट असे सांगितले. सावला यांनी विश्वास ठेवत त्याला पिन सांगितला आणि कुरेशीने त्यांच्या मोबाइलमधून ६४,२०० रुपये हे महिलेच्या अकाउंटवर पाठवले. त्यामुळे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. देवाच्या कृपेने खात्यात पैसे आले असे वाटून त्यातले साडेपाच हजार रुपये तिने खर्च केल्याचे सांगितले. कोणी मुद्दाम पैसे पाठवत तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करेल असे वाटते का? अशी विचारणा केल्यावर तिने कुरेशीचे नाव घेत त्यांना चिरागनगर पोलीस ठाण्यातील प्रकार सांगितला.

...आणि खरा आरोपी गजाआडकुरेशीने पोलिसांना चकवण्यासाठी स्वतःचे मोबाइल सिम वापरले नाही. मात्र सीसीटीव्हीच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावित, सहायक पोलीस फौजदार डी. बी. सय्यद आणि पथकाने योग्य तपास करत खऱ्या आरोपीला गजाआड केले. तर महिलेला याप्रकरणी साक्षीदार करण्यात आले आहे.  

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस