शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या घोटाळ्यांचे कर्दनकाळ किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा

By मनीषा म्हात्रे | Updated: March 4, 2023 09:16 IST

७ लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलुंडमधील कार्यालयातच श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी संगनमताने ‘ऐका स्वाभिमानाने’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रवणयंत्र वाटपातील जवळपास साडेसात लाखांच्या मशीनचा परस्पर अपहार केला आहे. ही बाब कार्यालय प्रमुखांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार, नवघर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

सोमय्या यांच्या निर्मलनगर, मुलुंड (पूर्व) कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल कदम यांच्या तक्रारीवरून नवघर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कदम हे २०१७ पासून सोमय्या यांचे कार्यालयातील कामकाज पाहतात. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी १९८० मध्ये युवक प्रतिष्ठान या चॅरिटेबल ट्रस्टचे उद्घाटन केले होते. सोमय्या या संस्थेचे अध्यक्ष आहेत. युवक प्रतिष्ठानतर्फे केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, मुंबई महापालिका यांच्या मदतीने एचआयव्हीग्रस्त तसेच दिव्यांग लोकांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात.

२०१७-१८ पासून संस्थेमार्फत ‘ऐका स्वाभिमानाने’ या उपक्रमांतर्गत कानाचे मशीन (श्रवणयंत्र) ५०० रुपये दराने ज्येष्ठ नागरिकांना दिले जातात. कॅम्पचे आयोजन करून मशीनचे वाटप होते. कार्यालयातील प्रज्ञा जयंत गायकवाड (३७) आणि श्रीकांत रमेश गावित (३६) यांची प्रकल्पप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. गायकवाड आणि गावित त्याचा हिशोब कदम यांना देतात. मिळालेली रक्कम बँकेत जमा केली जाते. 

 काही दिवसांपूर्वी कदम यांनी प्रज्ञा यांच्याकडे किती मशीन शिल्लक आहे? याबाबत विचारले. त्यांनी सर्व मशीनचे वाटप झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली. तेव्हा १ हजार ४७२ मशीनची जवळपास ७ लाख ३६ रुपयांची तफावत आढळली. दोघांकडे जाब विचारताच त्यांनी अपहार केल्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याfraudधोकेबाजी