शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आरबीआयच्या मॅनेजरलाच गुंतवणुकीच्या नावे गंडविले; महिलेने ६० लाखांना लावला चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:07 IST

फोर्ट येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे मॅनेजर जयवंत म्हसदे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिकाधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवून आरबीआयच्या मॅनेजरलाच एका टोळीने ६० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू असल्याचे सानपाडा पोलिसांनी मंगळवारी सांगितले. 

फोर्ट येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे मॅनेजर जयवंत म्हसदे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ते सानपाडा येथे राहायला असून, वर्षभरापूर्वी त्यांना एका महिलेने फोन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले होते. काही महिन्यांनी पुन्हा त्या महिलेने गुंतवणुकीचे फायदे पटवून दिले. तिच्यावर विश्वास ठेवून जयवंत यांनी पत्नीच्या नावे ट्रेडिंग अकाउंट उघडले. मात्र, गुंतवणुकीची रक्कम फोनवरून संपर्क साधणाऱ्या महिलेच्या खात्यावर पाठवली होती. सुरुवातीला काही रक्कम नफा स्वरूपात त्यांना मिळाली होती.

आरोपींची नावेही बनावट?फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर म्हसदे यांनी संपूर्ण रकमेची मागणी केली, तेव्हा संबंधितांनी त्यांच्याशी संपर्क तोडला. शशी जैन, शिखा चौहान, शिवानी चौहान, वेदवती शर्मा, भूपेंद्र सोनी व श्रेया यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, ही नावे बनावट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकfraudधोकेबाजी