शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाऊच निघाला वैरी, घर अन् रेशनसाठी संपवले कुटुंब; तिहेरी हत्याकांडाचा २४ तासात उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 10:01 IST

गणपती सण असल्याने आरोपी कधी नव्हे तो आपल्या मामाकडे राहायला गेला. त्यामुळे गुन्हा घडला तेव्हा मी मामाकडे होतो, असे आरोपीने भासवले होते

अलिबाग - नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा उलगडा रायगड पोलिसांनी २४ तासांत केला असून, या हत्याकांडामागे मृताचा भाऊच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. वडिलोपार्जित घर नावावर करीत नसल्याने, तसेच रेशनचे धान्य मिळत नसल्याने आरोपी हनुमंत पाटील याने तिघांची हत्या केली असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेरळमधील चिकन पाडा येथे मदन पाटील, त्यांची अनीषा उर्फ माधुरी पाटील पत्नी व मुलगा यांची ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता अज्ञाताने हत्या केल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे  यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर कर्जत उपविभागीय अधिकारी धुळा टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ, कर्जत पोलिस, तसेच स्थानिक गुन्हे विभागाने कोणताही पुरावा नसताना हत्येचा उलगडा केला आहे.

कपडे बदलले आणि तो सापडलागणपती सण असल्याने आरोपी कधी नव्हे तो आपल्या मामाकडे राहायला गेला. त्यामुळे गुन्हा घडला तेव्हा मी मामाकडे होतो, असे आरोपीने भासवले होते. मात्र, गुन्हा करताना आरोपीने सफेद शर्ट घातला होता, तर सकाळी अंगावर लाल टी शर्ट होता. तसेच शाळेतील सीसीटीव्हीमध्ये तो ये-जा करताना दिसला. त्याला पोलिसांनी संशयित म्हणून आधीच ताब्यात घेतले होते. पण, पोलिस चौकशीत समर्पकपणे उत्तरे दिल्याने पोलिसांवर त्याला सोडण्यापर्यंत वेळ आली होती. पण, पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश केलाच.

...अशी केली हत्याहनुमंत याने आपल्या मोठ्या भावाच्या कुटुंबाला संपविण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर केला होता. तिघांची कुऱ्हाडीने हत्या केल्यानंतर रक्त उडू नये म्हणून आरोपीने त्यावर लगेच कपडा टाकला. त्यामुळे घरात भिंतींवर रक्ताचे डाग अधिक प्रमाणात उडाले नसल्याचे तपासात उघड झाले.

...असा होता वादआरोपी हनुमंत आणि मदन हे एकाच घरातील दोन खोल्यांमध्ये शेजारी शेजारी राहात होते. हे वडिलोपार्जित घर भाऊ मदन यांच्या नावावर होते. रेशन कार्डदेखील एकत्रित असल्याने मदनकडेच होते. त्यामुळे अर्धे घर नावावर करण्यासाठी आणि रेशन देण्यावरून दोन्ही भावांची भांडणे होती.

तिहेरी हत्याकांडाचा तपास हा स्थानिक गुन्हे विभाग, नेरळ पोलिस यांनी यशस्वीपणे उघड केला आहे. आता दीड महिन्यात आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करू - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी