शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्यानेच केला कार्यालयातील तरुणीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 22:44 IST

सदर कार्यालयात गेल्या पाच - सहा महिन्यापासून १८ वर्षीय तरुणी काम करत होती.

मीरा रोड - महिला - मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून स्वतःला समाजसेवक म्हणवणाऱ्या संस्थेचा अध्यक्ष धर्मेंद्र शर्मा याला त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या १८  वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. पीडित तरुणी ही पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आहे.

भाईंदर पूर्वेच्या आरएनपी भागात राहणाऱ्या शर्मा याची राईपुर धर्मलक्ष्मी जनसेवा ट्रस्ट नावाची संस्था आहे.  या संस्थेच्या माध्यमातून कन्यादान उपक्रम अंतर्गत सामूहिक विवाह सोहळे आयोजित करत त्यासाठी मोठ्या प्रमाणात शर्मा हा देणग्या गोळा करतो. त्याचे सेवन स्क्वेअर शाळेच्या परिसरात कार्यालय आहे. 

सदर कार्यालयात गेल्या पाच - सहा महिन्यापासून १८ वर्षीय तरुणी काम करत होती. सोमवारी दुपारी शर्मा याने तरुणीला आपल्या दालनात बोलावून तिचा विनयभंग केला. घडल्या प्रकाराने अस्वस्थ असलेल्या तरुणीने घटनेची माहिती आपल्या आईला दिली. एरवी महिला व मुलींसाठी समाजकार्य करत असल्याचे दाखवणाऱ्या शर्माचा हा प्रकार ऐकून तिची आई देखील संतप्त झाली. मंगळवारी याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शर्मा याला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून संस्थेशी संबंधित महिला कार्यकर्त्या तसेच शहरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे