शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाला लुटून पळाले, अपघातात सापडले; इराणी टोळीच्या दोन सराईतांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 09:55 IST

मंगळवारी दुपारच्या सुमारास सीबीडी सेक्टर ५ येथील एसबीआय बँकेत हा प्रकार घडला. परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी बँकेत आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वृद्ध व्यक्तीच्या हातातली रक्कम लुटून पळ काढणाऱ्या इराणी टोळीच्या दोघांना सीबीडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. गुन्ह्यानंतर मोटारसायकलवरून पळ काढत असताना रिक्षाला धडकल्याने त्यांचा अपघात झाला. त्यामुळे नागरिक व नाकाबंदीतल्या पोलिसांनी तत्काळ त्यांच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. या अपघातामध्ये गुन्हेगारांसह रिक्षातले दोघे जखमी झाले असून, उपचारानंतर पोलिसांनी चोरट्यांना अटक केली.

मंगळवारी दुपारच्या सुमारास सीबीडी सेक्टर ५ येथील एसबीआय बँकेत हा प्रकार घडला. परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी बँकेत आले होते. यावेळी बँकेतून ४० हजार काढल्यानंतर ते पैसे मोजत असतानाच दबा धरून बसलेल्या गुन्हेगाराने त्यांच्याकडील रक्कम हिसकावली. त्यानंतर मोटारसायकलवर तयारीतच असलेल्या साथीदारासह दोघांनी पळ काढला; परंतु काही अंतरावर एका रिक्षाला त्यांची मोटारसायकल धडकली. गुन्हा करून पळत असल्याने त्यांची मोटारसायकल वेगात असल्याने हा अपघात झाला. नागरिक व काही अंतरावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचे नाव मेहंदी हसन लालू जाफरी व मोहसीन लालू खान असल्याचे समोर आले. 

अपघातामध्ये या दोघांसह रिक्षा चालक व रिक्षातील ८ वर्षांचा मुलगा जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उपचारानंतर मंगळवारी रात्री पोलिसांनी मेहंदी व मोहसीन या दोघांना अटक केली आहे. दोघेही मुंब्र्याचे राहणारे असून, सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून वृद्धाची लुटलेली रक्कम जप्त केली आहे. वृद्धाच्या हातातून पैसे खेचत असताना रक्कम खाली पडल्याने त्यांच्या हाती केवळ तेवढीच रक्कम लागली होती. दोघेही सराईत इराणी टोळीचे सदस्य असल्याने सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी निरीक्षक उमेश गवळी, सहायक निरीक्षक पवन पाटील, सचिन मोरे यांचे पथक नेमले होते. 

 गुन्ह्यासाठीची  मोटारसायकल चोरीची गुन्हेगारांनी वापरलेली मोटारसायकल कोपरखैरणेतून तीन महिन्यांपूर्वी चोरली होती. यासाठी त्यांनी बनावट आरसीबुकच्या आधारे गाडीवर बनावट नंबरही टाकला होता. मोहसीन व मेहंदी सराईत गुन्हेगार असून मोहसीनवर २, तर मेहंदीवर ७ गुन्हे दाखल आहेत. मेहंदी याच्यावर यापूर्वी मकोकाअंतर्गतदेखील कारवाई झाली आहे, तर वृद्धाला लुटल्याप्रकरणी त्यांच्यावर सीबीडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी