शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

फर्निचर व्यावसायिकाची हत्या; ऑर्डर द्यायची आहे सांगत मालकाला बोलावलं अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 06:17 IST

नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूलशेजारी असलेल्या किंग्स कोर्ट अपार्टमेंटमध्ये राहणारे शिरीष गुलाबराव सोनवणे (५६) यांचा एकलहरा रोडवर स्वस्तिक फर्निचर नावाचा कारखाना आहे.

नाशिकरोड : येथील एकलहरा रोडवरील लाकडी फर्निचर बनविणाऱ्या स्वस्तिक कारखान्याचे संचालक व्यावसायिक शिरीष गुलाबराव सोनवणे यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून करून मृतदेह  मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूलशेजारी असलेल्या किंग्स कोर्ट अपार्टमेंटमध्ये राहणारे शिरीष गुलाबराव सोनवणे (५६) यांचा एकलहरा रोडवर स्वस्तिक फर्निचर नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात शालेय लाकडी बाक तयार केले जातात. शुक्रवारी (दि. ९) दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास सोनवणे कारखान्यात आले होते. यानंतर एका स्वीफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्ती कारखान्यासमोर आल्या. त्यांनी कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख याला सोनवणे यांना ऑर्डर द्यायची आहे, असे सांगून गाडीजवळ पाठविण्यास सांगितले. मात्र, फिरोज याने त्यांना ‘आपणच कारखान्यात चला..,’ असे सांगितले असता गाडीतील व्यक्ती दिव्यांग असल्याचा संशयितांनी बनाव केला. त्यामुळे फिरोज याने मालक सोनवणे यांना कारखान्यात जाऊन तसा निरोप दिला. यानंतर सोनवणे हे बाहेर आले व गाडीत बसले. सोनवणे कुठेच सापडत नसल्याने पत्नीने तक्रार दिली होती. 

सीसीटीव्हीची पाहणी; कामगारांकडे चौकशीशनिवारी सकाळी मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात सोनवणे यांचा मृतदेह मालेगाव पोलिसांना सापडला. मृतदेहावर विविध जखमाही असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वस्तिक कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे अगोदरपासूनच बंद असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कारखान्यामध्ये बारा कामगार कामाला असून, त्यांची प्राथमिक चौकशी पोलिसांनी केली आहे. मात्र, कुठलाही सुगावा हाती लागला नाही.