शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करणाऱ्या सराईतास चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यासह अटक

By धीरज परब | Updated: May 18, 2024 17:50 IST

मीरारोड - भाईंदर पश्चिमेस एका मोबाईल दुकानाची भिंत तोडून आतील मोबाईल, स्मार्ट वॉच रोख असा २ लाख ६१ हजार रुपये ...

मीरारोड - भाईंदर पश्चिमेस एका मोबाईल दुकानाची भिंत तोडून आतील मोबाईल, स्मार्ट वॉच रोख असा २ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत चोरट्यासह चोरीचा माल विकत घेणाऱ्या दुकानदारास भाईंदर पोलिसांनी अटक केल्याची माहिती मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे. 

भाईंदर पोलीस ठाण्यातील पत्रकार परिषद वेळी उपायुक्त गायकवाड यांनी माहिती दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी, गुन्हे निरीक्षक विवेक सोनावणे यांच्या सह गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, उपनिरीक्षक प्रसाद गोवले सह रवींद्र भालेराव, राजेश श्रीवास्तव, किरण पी.  पवार  व किरण आर. पवार, सुशील पवार, रामनाथ शिंदे, संजय चव्हाण, सलमान पटवे, जयप्रकाश जाधव यांचे पथक उपस्थित होते.  

भाईंदर पश्चिमेस एक मोबाईल दुकानाची भिंत तोडून दुकानातील नवीन मोबाईल, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, जुने रिपेरिंगचे मोबाईल व गल्ल्यातील रोख असा २ लाख ६१ हजार ४५१ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्या प्रकरणी २७ एप्रिल रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यात एकजण संशियत आढळून आला. 

त्याची छायाचित्रे विविध पोलिसांना तसेच खबऱ्यांना पाठवण्यात आली होती. तपासात तो इसम तपस ऊर्फ टायसन असल्याचे व तो मुंबईतील डेक्कन रोड फुटपाथ येथील फिरस्ता असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून तपाला अटक केली असता  तपस ऊर्फ टायसन जुगलचंद उरवी ( वय ४२  ) असे त्याचे खरे नाव समोर आले  टायसन याला अटक केल्यावर त्याची सखोल चौकशी केली असता चोरीचे जुने मोबाईल, स्मार्ट वॉच आदी त्याने चोर बाजारात विक्रीसाठी दिले होते. 

तर नवीन मोबाईल त्याने अब्दुल रहीम खलील शेख रा. मुसाफिर खाना, मस्जिद बंदर, मुंबई याला विकले होते. शेख याने ते मोबाईल पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथील त्याच्या भावाला कुरीयर ने पाठविले होते.  पोलिसांनी शेख ह्याला देखील अटक केली. तसेच गुन्हयात चोरी केलेले ३५ मोबाईल , ७ स्मार्ट वॉच असा २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले  करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी