शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पतीने महागडा मोबाईल गिफ्ट केला पण एका गोष्टीनं घात झाला; पत्नीनं स्वत:ला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 08:41 IST

आमच्या दोघांचे भांडण रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तेव्हा ज्योतीने माझ्यासमोर विष प्यायलं. हे पाहून मी घाबरलो आणि बेशुद्ध पडलो असं पतीने सांगितले. 

मलकानगिरी - ओडिशात एका महिलेने नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे जीव दिला आहे. या महिलेच्या आत्महत्येने परिसरात खळबळ माजली आहे. मात्र आत्महत्येचं जे कारण समोर आलं त्याने सगळेच हैराण झाले आहेत. या महिलेच्या पतीने तिला स्मार्टफोन गिफ्ट केला होता. हा फोन EMI वर खरेदी केला होता. परंतु ही गोष्ट पत्नीला माहिती नव्हती. यावरूनच दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. 

ही मंगळवारी रात्रीची आहे. मलकानगिरी जिल्ह्यातील एमपीवी १४ गावातील रहिवासी कनहेई मंडलची पत्नी ज्योतीनं आत्महत्या केली. या दोघांच्या लग्नाला दीड वर्ष झाले होते. पती कनहेईनं पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, मी माझी पत्नी ज्योतीला स्मार्टफोन गिफ्ट केला होता. फोन खूप महाग होता. एकसाथ पूर्ण पैसे देणे शक्य नव्हतं. त्यासाठी फोन ईमआयवर खरेदी केला. परंतु ही गोष्ट ज्योतीला माहिती नव्हती. 

मी फोनचा अखेरचा हफ्ताही भरला होता. ज्याठिकाणी मी मोबाईल खरेदी केला तिथून ईएमआयचे कागद सहीसाठी घरी आले. तेव्हा EMI बाबत ज्योतीला कळालं. त्यावरून तिचं माझ्याशी भांडण झाले. ही गोष्ट तू मला का सांगितली नाही यावरून ज्योतीने वाद घातला. आमच्या दोघांचे भांडण रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तेव्हा ज्योतीने माझ्यासमोर विष प्यायलं. हे पाहून मी घाबरलो आणि बेशुद्ध पडलो असं पतीने सांगितले. 

कनहेई आणि ज्योती या दोघांना कुटुंबातील सदस्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. ज्याठिकाणी डॉक्टरांनी ज्योतीला मृत घोषित केले. कनहेईवर उपचार सुरू आहेत. पत्नीच्या मृत्यूने कान्हेला धक्का बसल्याचे डॉक्टरांचे म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या तपास सुरू आहे. पतीचा जबाब नोंदवून घेतला आहे. कुटुंबातील इतर सदस्यांचेही जबाब झाले आहेत. ही आत्महत्या होती की हत्या या अँगलने पोलीस तपास करत आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"