शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वीचे अफेअर कबूल करून पस्तावला; पत्नीनं पतीच्या बदनामीचा डाव रचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 06:48 IST

व्हॉट्सॲप डेटा काढत पत्नीकडून बदनामीची धमकी 

मुंबई : लग्नापूर्वीच्या अफेअरची कबुली पत्नीला देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने कस्तुरबा पोलिसात धाव घेतल्यावर पत्नी आणि सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पूर्वेतील कार्टर क्रॉसरोड क्रमांक ३ येथे पीडित राहतो. पीडित एका नामांकित कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्याची पत्नी आयुर्विमा कंपनीत व्यवस्थापक आहे. जानेवारीमध्ये त्यांचे लग्न झाले. पत्नीने पीडिताला लग्नापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधांबद्दल विचारले होते. तेव्हा पतीने एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. महाबळेश्वरला हनिमूनला गेला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याच्या मोबाइलमधून व्हॉट्सॲप चॅटचा बॅकअप डेटा व फोटो काढला. त्यानंतर तेच फोटो त्याला दाखवून ती भांडू लागल्याचा पतीचा आरोप आहे.  त्यानंतर ३ ऑक्टोबरला तिने संपूर्ण चॅट आणि फोटो तिच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपवर पाठवले. आता त्याच्या सासऱ्यांनी त्याला व्हॉट्सॲपवर धमकी दिली होती की तो व्हॉट्सॲप चॅटचे बॅनर बनवेल व गेटवर त्याच्या राहत्या इमारतीच्या बाहेर लावेल. त्यामुळे पीडित घाबरला आणि बदनामीच्या भीतीने त्याने पोलिसांकडे मदत मागत तक्रार दाखल केली.