शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हनीमुनच्या रात्रीच नवऱ्यानं घेतला गळफास; लटकलेला मृतदेह पाहून नवरी बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 19:44 IST

लग्नमंडपात शोककळा पसरली. हसऱ्या चेहऱ्यांवर दु:ख आले. नवरीची अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

प्रयागराज - उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथं अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. याठिकाणी बालापुर इथं एका युवकानं लग्नाच्या दिवशीच सुसाईड केल्यानं खळबळ माजली आहे. घरात नवविवाहित आली होती. नवरीच्या स्वागतासाठी घरातील महिलांची लगबग सुरू होती. तेव्हा अचानक नवऱ्याने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. ज्या खोलीत हनीमुन होणार होते तिथेच नवऱ्यानं अखेरचा श्वास घेतला. 

मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय नागेश घराच्या बाजूलाच किराणाचं दुकान चालवत होता. सोमवारी नागेशचं लग्न घुरपूर इथं राहणाऱ्या मुलीसोबत झाले. लग्नानंतर नवरा-नवरी एकत्र घरी पोहचले. सर्वकाही ठीक सुरू होते. लग्नामुळे घरात आनंदाचं वातावरण होते. नवरीच्या स्वागतासाठी महिला गीत गात होत्या तेव्हा अचानक घरातील एका व्यक्तीने नवरदेव नरेशनं त्याच्या खोलीत आत्महत्या केल्याचं पाहिलं त्यानंतर लग्नघरात गोंधळ उडाला. 

नरेशचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला. नवऱ्या मुलाचा मृतदेह पाहून नवरीही हडबडली. कदाचित नरेश जिवंत असेल असं कुटुंबाला वाटलं त्यांनी तात्काळ त्याला खाली उतरवले आणि हॉस्पिटलला उपचारासाठी नेले. परंतु डॉक्टरांनी त्याठिकाणी युवकाला तपासून मृत घोषित केले. 

नवऱ्याचा मृतदेह पाहून नवरी चक्कर येऊन बेशुद्ध पडली. घरात लग्नामुळे आनंदाचं वातावरण होतं त्याठिकाणी नरेशनं उचललेल्या या टोकाच्या पावलानं दु:खाचा डोंगर कोसळला. लग्नमंडपात शोककळा पसरली. हसऱ्या चेहऱ्यांवर दु:ख आले. नवरीची अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले. लग्नानंतर असं काय घडलं ज्याने नरेशला आत्महत्या करावी लागली हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. नरेशच्या आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली. नातेवाईकांनी पोलिसांना न सांगताच नरेशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. अद्याप पोलिसांना या घटनेची माहिती नाही त्यामुळे त्यांनीही बोलणं टाळलं आहे.