शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

प्रियकराला झटक्यात श्रीमंत करू इच्छिणारी प्रेयसी पोहोचली कोठडीत!

By प्रदीप भाकरे | Updated: October 14, 2022 18:13 IST

भातकुली तहसीलसमोरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरांनी २५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार ८ ऑक्टोबर रोजी नोंदविण्यात आली होती.

अमरावती: अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या घरातील रोख व सोन्याच्या दागिण्यांबाबत टिप देऊन ती चोरी यशस्वी करण्यात लाखमोलाचा सहभाग असलेली तरूणी अखेर गजाआड झाली. प्रियकराला झटक्यात श्रीमंत करू इच्छिणाऱ्या त्या प्रेयसीला फ्रेजरपुरा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. तर अन्य दोन आरोपींकडून चोरीला गेलेले सुमारे ११ लाख ८ हजार रुपयांचे २७७ ग्रॅम सोने व २० लाख रुपये रोख असा ३१ लाख ७८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ठाणेदार अनिल कुरळकर यांच्या नेतृत्वातील ‘टिम फ्रेजरपुरा’ने हे बंपर यश मिळविले.

भातकुली तहसीलसमोरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरांनी २५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार ८ ऑक्टोबर रोजी नोंदविण्यात आली होती. मात्र, पुढे चोरीला गेलेले सोन्याचे दागिने २५० ग्रॅमपेक्षा जास्त असून सोबतच प्लॉट विक्रीतून आलेली २० लाखांची रोखसुध्दा चोरांनी पळविल्याचे फिर्यादी महिलेने सांगितले होते. तपासादरम्यान सीसीटिव्हीने पोलिसांना अनेक पुरावे दिले. तरुणीने तिच्या प्रियकराला माहिती दिल्यानंतर ती चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. सबब, फ्रेजरपुरा पोलिसांनी शोएब खान मंजूर खान (२३, रा. ताजनगर), शेख जुबेर शेख ताज (३१, रा. सुफियाननगर) व शेख जुबेरच्या १९ वर्षीय प्रेयसीला अटक केली. गुन्ह्यातील संपुर्ण ३१ लाख रुपयांची जप्ती अवघ्या दोन तीन दिवसांमध्ये केल्याने ‘टिम फ्रेजरपुरा’चे काैतूक केले जात आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी तरूणी ही तंत्रनिकेतन तृतीय वर्षाची विद्यार्थीनी आहे.

तरूणीलाही अटकफिर्यादी महिलेच्या पतीची जवळची आप्त असलेल्या १९ वर्षीय तरुणीने तिचा प्रियकर शेख जुबेरला त्या घरातील दागिने व रोख रकमेबाबत माहिती दिली. चोरीच्या वेळी ती तरूणी घटनास्थळाच्या शेजारी कारमधून आत बाहेर करताना सीसीटिव्हीत कैद झाली होती. त्या कारमुळे संपुर्ण प्रकरणाचा तत्काळ उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान चोरीचा संपुर्ण माल जुबेरने स्वत:कडे ठेवला होता. पोलिसांनी त्याच्या घरातून २७७ ग्रॅम दागिने व २० लाखांची रोख जप्त केली. तसेच कार देखील जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल कुरळकर, पीआय नितीन मगर, पीआय निशीकांत देशमुख, निलेश जगताप, शशीकांत गवई, विनोद काटकर यांनी केली.

आरोपींकडून २० लाखांची रोख व २७७ ग्रॅम दागिणे जप्त करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी एका तरूणीला देखील अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.- अनिल कुरळकर, ठाणेदार, फ्रेजरपुरा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती