शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

भावी जोडीदार निघाला दोन मुलांचा बाप अन् ठग; आयकर आयुक्त असल्याची बतावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 08:46 IST

उत्तर प्रदेशमधून इंजिनीअरला बेड्या

मुंबई : विवाह संकेतस्थळावरून आयकर विभागाचा आयुक्त असल्याचे भासवून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुखी संसाराचे स्वप्न रंगवत असतानाच, सामाजिक संस्थेत मदत, गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तरुणीच्या कागदपत्रांवर कर्ज काढून तिला कर्जबाजारी केले. चौकशीत तो दोन मुलांचा बाप असून बनावट नावाने तरुणीच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गावदेवी पोलिसांच्या कारवाईतून ही बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेशच्या मॅकेनिकल इंजिनीअर राजेश कुमार उपाध्याय (४५) याला अटक करण्यात आली आहे.  

ग्रॅन्टरोड परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीशी एप्रिल २०२१ मध्ये विवाह संकेतस्थळावरून राजेशने सिद्धांत धवन या नावाने संपर्क साधला. पुढे, आयकर आयुक्त तसेच रॉ मध्ये नोकरीस असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवले. याच दरम्यान, एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान आरोपीने स्वतःची एनजीओ असल्याचे सांगून मदतीच्या नावाखाली तरुणीची कागदपत्रे मिळवली. पुढे त्याच कागदपत्रांवर ५ लाखांचे कर्ज घेतले. ते पैसे तरुणीच्या खात्यात जमा होताच ते त्याच्या खात्यात वळते करून घेतले.  वेगवेगळी कारणे पुढे करत त्याने ११ लाख १३ हजार रुपये उकळले.

आरोपी चालवत होता स्वतःची अकॅडमी राजेश उपाध्याय याने मॅकेनिक इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. तसेच, लखनौमध्ये तो स्वतःची यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी चालवत होता. मात्र, त्याला प्रतिसाद कमी मिळाल्याने त्याने ती बंद केली. त्यानंतर, झटपट पैसे कमविण्यासाठी अशाप्रकारे ठगीचा धंदा सुरू केला आहे. 

फोटो व्हायरल करण्याची धमकीपुढे, आणखीन पैशांची मागणी होताच तरुणीने त्याच्याशी संवाद कमी केला. त्यानंतर, एका अर्धनग्न महिलेचा फोटो पाठवून तिचे फोटोदेखील तसेच व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. 

उत्तर प्रदेश कनेक्शन झाले उघडवरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताराम गिरप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विजय दंडवते, पीएसआय किरण जाधव, हेमंत उगले, पोलिस अंमलदार कांबळे, जाधव, चव्हाण आणि कड यांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास सुरु केला. यामागे उत्तर प्रदेश कनेक्शन उघडकीस येताच पथकाने त्याला सुलतानपूर येथून अटक केली आहे. 

अनेकांची फसवणूक उपाध्यायच्या मोबाईलमध्ये अनेक मुलीचे मोबाईल क्रमांक मिळाले असून, त्याने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पथकाला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी