शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नपत्रिकेवर नवरीच्या भावानं 'असं' काही छापलं; पोलीस संतापले, युवकाला झाली जेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 17:49 IST

आकाशच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका शहरात सगळीकडे वाटून झाली होती. आकाशने परिसरातील  एसपी राकेश कुमार सिंग यांनाही लग्नाला बोलावले होते.

मध्य प्रदेशातील दमोह येथून एक अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी नवरीच्या भावाने लग्नपत्रिकेत अशी एक गोष्ट छापली की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आणि त्याला तुरुंगात जावे लागले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा स्वीय सचिव असल्याचे सांगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तुरुंगात टाकले त्यानंतर कुटुंबाला धक्का बसला. 

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा खाजगी सचिव दमोहशी संबंधित आहेत. दमोहच्या सिव्हिल वॉर्ड क्रमांक तीनमध्ये राहणाऱ्या आकाश दुबे नावाच्या व्यक्तीच्या बहिणीचे लग्न होते, या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर आकाश दुबे याने त्याच्या नावापुढे खासगी सचिव, माननीय मुख्यमंत्री, मध्य प्रदेश सरकार असा पद लिहिले होते. 

लग्नपत्रिकेमुळे उडाला गोंधळआकाशच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका शहरात सगळीकडे वाटून झाली होती. आकाशने परिसरातील  एसपी राकेश कुमार सिंग यांनाही लग्नाला बोलावले होते. ही गोष्ट एसपींच्या पचनी पडली नाही आणि त्यांनी भोपाळ स्तरावर चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की मुख्यमंत्र्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये अशा नावाचा कुणीच नाही. त्यानंतर स्वत: दमोहच्या एसपींनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून कोतवाली पोलिसांना तपासाचे आदेश दिले, त्यानंतर आकाश दुबे या पदाचा गैरवापर करत असल्याचं स्पष्ट झाले, या युवकाला ताब्यात घेऊन फसवणूक आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आकाशला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

रात्री उशिरा मीडियाला माहिती देताना एसपी राकेश कुमार सिंह म्हणाले की, असे कृत्य गुन्हेगारी श्रेणीत येते, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आकाश अनेक दिवसांपासून या पदाचा हवाला देऊन परिसरातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मूर्ख बनवत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दमोह पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.