शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मुलांनी घराबाहेर काढलं, मुलीनेही नाकारलं; वृद्ध बापाची व्यथा ऐकून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 12:37 IST

२ कमवती मुले आणि ४ मुली असूनही बापाला दारोदारी भटकत राहावं लागलं. मुलांनी घरातून बाहेर काढलं

लखनौ - मागील ३ दिवसांपासून वृद्ध वडिलांना घरात घेण्यासाठी २ मुलांचं समुपदेशन सुरू आहे परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. मुलांच्या करतुतीमुळे वैतागलेल्या बापाने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी वृद्धाच्या तक्रारीवरून मुलगा विजय आणि बृजेश यांच्यावर मारहाण आणि छळवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वृद्धाश्रमात डोक्यावर छत आणि खायला दोनवेळचं इज्जतीचं जेवण मिळेल. आयुष्याचे ४ दिवस राहिले ते इथेच काढेन. पण मुलांसोबत जाणार नाही अशी भूमिका बापानं घेतली. 

या वृद्ध बापाने पोटच्या मुलांवर आरोप केला आहे की, त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा छळ केला. मोठ्या मुलाने तर मारलं आहे. घरातून अपमानास्पद वागणूक देत बाहेर काढलं. आजारपणात एका हातात युरिन बॅग घेऊन वृद्ध रस्त्यावर पडला होता. तेव्हा वन स्टॉप सेंटरच्या टीमच्या मदतीने या वृद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ज्यांची मुले आहेत त्यांना म्हातारपणी कसली चिंता असं म्हटलं जातं. परंतु ८५ वर्षीय रामेश्वर प्रसाद यांची व्यथा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील. 

२ कमवती मुले आणि ४ मुली असूनही बापाला दारोदारी भटकत राहावं लागलं. मुलांनी घरातून बाहेर काढलं तर मुलीने स्पष्ट शब्दात म्हटलं. मुले आहेत त्यांच्याकडे जा, आमच्याकडे ठेऊ शकत नाही. हातात युरिन बॅग घेत रस्त्यावर पडलेल्या रामेश्वर प्रसाद यांना एका सामाजिक संस्थेने पाहिले. मागील सोमवारी त्यांना सरोजनीनगरच्या वृद्धाश्रमात ठेवण्यात आले. या सेंटरच्या एका कार्यक्रमावेळी रामेश्वर प्रसाद यांनी पत्र लिहून स्वत:ची व्यथा मांडली. 

काय म्हणाले रामेश्वर प्रसाद?जुन्या टिकेतगंज येथे घर होते. मसाल्याचं काम करत होता. वाढत्या वयामुळे काम बंद झाले. ४ मुली होत्या त्यांचे लग्न झाले आहे. मुले वाहन चालक म्हणून काम करतात. याच मुलांनी मला बाहेर काढलं. तब्येत बिघडल्यानंतर मी बलरामपूर हॉस्पिटलमध्ये जात दाखल झालो. तिथून शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुलीच्या घरी गेलो तिने तिच्या घरात ठेवण्यास नकार दिला. कमाई बंद झाल्यानंतर मी ओझं बनून जगतोय. मोठ्या मुलाने दोनदा मला मारहाण केली. आता कामही करू शकत नाही. जेवणाची आणि औषधाची चणचण जाणवते असं त्यांनी म्हटलं. 

Senior Citizen Act काय आहे?वृद्ध आई-वडील यांचा छळ करण्याचा गुन्हा सिनिअर सीटीजन एक्ट अंतर्गत येतो. २०१९ मध्ये या कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर सावत्र मुले, दत्तक मुले आणि सून यांनाही कायद्यांतर्गत आणले. यात १० हजार प्रति महिना किंवा त्याहून अधिक भरपाई करण्याचे आदेश कोर्ट देऊ शकतं. त्याचसोबत ३ महिने जेल, १० हजार दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. कायद्यानुसार, सासू-सासरे, आजी आजोबा यांचा छळ करणेही कायद्याने गुन्हा आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"