शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुलानेच वृद्ध आईला छडीने काढले फोडून; रक्ताने माखलेल्या तीन काठ्या हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 07:15 IST

crime news : पोलिसांनी घटनास्थळाहून अशा तीन मोडलेल्या आणि रक्ताने माखलेल्या काठ्या हस्तगत केल्या असून, आराेपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

मुंबई : माहिममध्ये माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे. ज्यात जन्मदात्या ६५ वर्षांच्या आईला तिच्या पोटच्या मुलाने लाकडाच्या काठीने  फोडून काढले. पोलिसांनी घटनास्थळाहून अशा तीन मोडलेल्या आणि रक्ताने माखलेल्या काठ्या हस्तगत केल्या असून, आराेपीला बेड्या ठोकल्या आहेत. माहिम पश्चिमच्या जहागीरबाग येथील खोली क्रमांक ५५ मध्ये हा प्रकार घडला. याठिकाणी जेसन जोसेफ मास्करेन्हस (३६) हा त्याची आई इनाशिन मास्करेन्हस (६५) यांच्यासोबत राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशिरा रात्री जेसन याने त्याची आई इनाशीन यांना लाकडाच्या काठीने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर तुटलेल्या काठीच्या तुकड्यांनीही त्यांच्यावर वार करत त्यांना रक्तबंबाळ करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जेसनचे आईसोबत संपत्तीवरून वाद सुरू आहेत. जखमी इनाशीन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखलवरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना घटनास्थळी रक्ताचे डाग असलेल्या व तुटलेल्या ३ लाकडी काठ्या सापडल्या आहेत. त्या त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. आम्ही आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याची चौकशी करत आहोत, असे कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbaiमुंबई