शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चेंडू अंगणात ठेवून त्यावर गरम पाणी ओतले अन् झाला स्फोट; महिला गंभीर जखमी

By विलास गावंडे | Updated: August 5, 2022 19:11 IST

Blast Case : ही घटना तालुक्यातील सावंगा पेरका येथे घडली.  या प्रकरणी राळेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

यवतमाळ : शेतात निंदणाकरिता गेलेल्या महिलेला चेंडूच्या आकाराची वस्तू आढळली. हा चेंडू तिने लहान मुलाला खेळण्यासाठी आणला. घरी आणून त्यावर गरम पाणी ओतले असता स्फोट होऊन महिलेच्या अंगठा तसेच तर्जनी बोटाला गंभीर जखम झाली. ही घटना तालुक्यातील सावंगा पेरका येथे घडली.  या प्रकरणी राळेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

पेरकी सावंगा येथील मनोरमा गजानन बेडदेवार या गावातील एकनाथ फुलकार यांच्या शेतात निंदणाचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. निंदणाच्या ओळीत त्यांना चेंडूच्या आकाराची वस्तू आढळली. हा चेंडू लहान मुलांना खेळण्याकरिता होईल म्हणून घरी आणला. तो साफ व्हावा या उद्देशाने त्यांनी चेंडू अंगणात ठेवून त्यावर गरम पाणी ओतले असता अचानक त्या चेंडूचा स्फोट झाला. या स्फोटात मनोरमा यांच्या डाव्या हाताचा अंगठा तसेच तर्जनी बोटाला गंभीर इजा झाली आहे. शेतातील डुकरांना मारण्याकरिता अज्ञात इसमाने गावठी बॉम्ब तयार केला असावा आणि तो शेतामध्ये ठेवला असावा, असा अंदाज असून या प्रकरणी सचिन भानुदास अंकतवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध राळेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Blastस्फोटYavatmalयवतमाळPoliceपोलिस