शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘लूक आउट’वरील आरोपी १२ मिनिटांत निसटला; मुंबई विमानतळावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 06:17 IST

जहांगीर मोहम्मद हनिफा असे या आरोपीचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एका गुन्ह्याप्रकरणी त्याच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी होती. त्याचा शोधही सुरू होता आणि अचानक तो इथियोपियावरून मुंबईविमानतळावर दाखल झाला तेव्हा इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांना त्याच्या विरोधातील नोटीस लक्षात आल्यामुळे त्याला बाजूला उभे केले. पण तिथून तो कधी गायब झाला, हे अधिकाऱ्यांना समजलेच नाही आणि आता पुन्हा त्याचा शोध सुरू झाला आहे. ही नाट्यमय घटना मुंबई विमानतळावर गुरुवारी घडली.

जहांगीर मोहम्मद हनिफा असे या आरोपीचे नाव असून तो तामिळनाडूचा आहे. त्याच्याविरोधात तामिळनाडूत गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात सर्व विमानतळांवर लूक आउट नोटीस जारी केली. हनिफा मुंबईत उतरला त्यावेळी त्याचा पासपोर्ट तपासल्यावर  त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी तामिळनाडू पोलिसांनाही त्याची माहिती दिली. त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्याची विनंती तामिळनाडू पोलिसांनी केली होती. दरम्यान, विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी हनिफाची अन्य कागदपत्रे तपासण्यासाठी त्याला दुसरीकडे नेले. एका कार्यालयात बसवून संबंधित अधिकारी कागदपत्रांची तपासणीसाठी गेला. तो अधिकारी १२ मिनिटांनी पुन्हा आला त्यावेळी हनिफा गायब झाल्याचे दिसून आले. सहार पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :AirportविमानतळMumbaiमुंबई