शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदाराचा रायटर २७  हजारांची लाच घेताना गजाआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 20:41 IST

Bribe Case : रामदासपेठ पोलिस ठाण्यातील ठाणेदाराचा रायटर गणेश पाटील यास गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या विविध ठिकाणावर देशी व विदेशी दारूची अवैधरित्या होम डिलिव्हरी करणारा ऑटो पकडल्यानंतर तो ऑटो सोडून देण्यासाठी तसेच त्यानंतर हा व्यवसाय करू देण्यासाठी सुमारे २७  हजार रुपयांची लाच मागणाऱ्या रामदासपेठ पोलिस ठाण्यातील ठाणेदाराचा रायटर गणेश पाटील यास गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली.रामदास पेठ पोलीस पोलिसांनी दारूची अवैधरित्या वाहतूक व विक्री करणारा ऑटो पकडला. त्यानंतर ऑटोसाहित दारूचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ऑटो चालक, ऑटो व मुद्देमाल सोडून देण्यासाठी रामदासपेठ पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांचा रायटर असलेला गणेश रामराव पाटील याने २७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली; मात्र चालकास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २७  हजार रूपयांची लाच घेताना गणेश पाटील यास रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या लाचखोरी प्रकरणात अकोला एसीबीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्यात येत आहे. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका रायटरने सुमारे २७ हजार रुपयांची लाच मागने ही मोठी रक्कम आहे. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे. याचाही शोध आता अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनBribe Caseलाच प्रकरण