शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन दिला टास्क; ५९ लाखांची फसवणूक, तरुणीला दाखविले पैशाचे आमिष  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 11:51 IST

भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील सरस्वती सदनमध्ये राहणाऱ्या निकिता दिगंबर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री अनोळखी सायबर लुटारूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरारोड : भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाणे हद्दीतील सायबर लुटारूंनी टेलिग्रामद्वारे संपर्क करून ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवून पाच जणांची तब्बल ५९ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यापैकी भाईंदरच्या एका तरुणीचे सुमारे ४० लाख, तर एका व्यक्तीचे १२ लाख आहेत. 

भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील सरस्वती सदनमध्ये राहणाऱ्या निकिता दिगंबर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री अनोळखी सायबर लुटारूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी व्यक्तीने टेलिग्रामद्वारे संपर्क करत ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास घरबसल्या चांगली कमाई होईल, असे आमिष दाखविले. पार्ट टाइम जॉब असल्याने चव्हाण यासह हितेश बाबरिया व अन्य तिघांनी ऑनलाइन टास्क पूर्ण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काम केल्याचे काही पैसे देण्यात आले. 

आणखी पैसे भरण्याची मागणी झाली आणि...टास्क म्हणून गुंतविलेले पैसे परत मिळण्यासाठी आणखी पैसे भरण्याची मागणी होऊ लागली. नंतर पैसे मिळाले नाहीत म्हणून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. निकिता चव्हाण यांची सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. हितेश बाबरिया यांना सुमारे १२ लाखांना फसविले आहे. याशिवाय, अन्य तिघांची सुद्धा फसवणूक केली. पोलिसांनी पाच जणांच्या फसवणुकीचा एकत्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय केदारे करीत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम