शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह कारमधून फेकला; अनेक तास वाहनं गेल्यानं मृतदेह ओळखू येईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 13:57 IST

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृतदेह रस्त्यावर फेकत असतानाचं दृश्य कैद; पोलीस तपास सुरू

कोईम्बतूर: तमिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात महिलेचा अर्धनग्न स्थितीतील मृतदेह अविनाशी रोडवर एका कारमधून फेकण्यात आला. चिन्नीयापलायम इथे घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत मृतदेहावरून असंख्य वाहनं गेली होती. मृतदेह छिन्नविच्छन्न अवस्थेत असल्यानं मृतदेहाची ओळख पटलेली नाही. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी आणि तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या शरीरावरून अनेक वाहनं गेल्यानं तिचा चेहरा ओळखू येत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. रस्त्यावरून जात असलेल्या काहींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.पाण्याचे नळ सुरू करताच ४० घरांमध्ये यायची देशी दारू; तक्रारीनंतर उघडकीस आला भलताच प्रकार

घटनेची माहिती मिळताच पोलीस चिन्नीयापलायम इथे पोहोचले. मात्र तोपर्यंत मृतदेहाची अक्षरश: चाळण झालेली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कोईम्बतूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. एका फुटेजमध्ये कारमधून मृतदेह रस्त्यावर फेकून देत असल्याचं दृश्य कैद झालं आहे. त्यानंतर त्या मृतदेहावरून दोन वाहनं गेली असल्याचं दिसत आहे.

रस्ता ओलांडताना महिलेला अपघात झाला असावा आणि त्यानंतर वाहनं तिच्या शरीरावरून गेली असावीत असा पोलिसांचा प्राथमिक समज होता. मात्र त्यानंतर पोलिसांना हत्येचा संशय आला. मृतदेह अर्धनग्न स्थितीत सापडल्यानं संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली. महिलेचा ऑटोप्सी अहवाल आल्यानंतर हत्येचं नेमकं कारण समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.