शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फ्लिपकार्टमध्ये चोरी करून गेला स्विगीत! एमएचबी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 13:33 IST

तक्रारदार अभिषेक साईल (३३) हे कंपनीत मॅनेजर असून बोरीवली पश्चिमेच्या जयराजनगरमध्ये त्यांचे ऑफिस आहे.

मुंबई : ऑनलाइन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय शैलेश दिघसकर (४०) याला एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने डिलिव्हरी केलेल्या पार्सलचे जवळपास सव्वा लाख रुपये घेऊन तो पसार झाल्यावर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारदार अभिषेक साईल (३३) हे कंपनीत मॅनेजर असून बोरीवली पश्चिमेच्या जयराजनगरमध्ये त्यांचे ऑफिस आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दीपक हिंडे व पोलिस शिपाई घोडके यांनी दिघसकरच्या मोबाइलचे सीडीआर व इतर तांत्रिक गोष्टींचे विश्लेषण केले. त्यानुसार त्याचा शोध घेऊन त्याला मीरा रोड परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी हा स्विगी कंपनीमध्ये ऑर्डर डिलिव्हरी करण्याचे काम करत होता. त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन अटक केल्याचे कुडाळकर यांनी सांगितले. 

दिघसकर हा वर्षभरापासून फ्लिपकार्टमध्ये काम करत होता. साईल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, १४ मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता तो कामावर आला आणि त्याने एकूण १५ पार्सल कॅश ऑन डिलिव्हरीचे घेतले. ते सर्वत्र देऊन आल्यानंतर पार्सल बॅग ऑफिसला ठेवली. नंतर घरी जाऊन जेवण करून येतो म्हणून सांगितले आणि परतलाच नाही, असे पोलिसांनी सांगितले. 

उडवाउडवीची उत्तरे ही बाब टीम लीडर रवींद्र धुरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शैलेशला फोन करत पैसे जमा न केल्याबाबत जाब विचारला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानुसार या प्रकरणी कंपनीने पोलिसात धाव घेतली. शैलेशविरोधात गुन्हा दाखल केला. फ्लिपकार्ट कंपनीचे १ लाख २३ हजार ४४७ रुपये त्याने पळवून नेले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी