शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय; त्यात चित्रपट पाहायला गेल्याने पतीने केला पत्नीचा खून

By नारायण बडगुजर | Updated: December 19, 2023 22:40 IST

खून केल्यानंतर पती मद्यपान करून दुकानात थांबला

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग तसेच चारित्र्यावर संशय असतानाच विवाहिता चित्रपट पाहण्यासाठी गेली. या कारणावरून तिचा खून केला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी विवाहितेच्या पतीला अटक केली. पिंपरीगाव येथे रविवारी (दि. १७) ही घटना उघडकीस आली.  शामल बिडलान, असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती अजय मोहन बिडलान (३२, रा. सुभाषनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली. मयत शामल हिचे वडील सुजित सतपाल शिल्ले (४९, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १८) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजित शिल्ले यांची  मुलगी शामल हिचा दहा वर्षांपूर्वी अजय बिडलान याच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना आठ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, शामल आणि पती अजय यांच्यात वाद झाले. त्यामुळे शामल हिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे अजय याला राग होता. तसेच शामल हिच्या चारित्र्यावर देखील संशय होता. या वादातून शामल गेल्या दोन महिन्यांपासून पिंपरीगाव येथे भाडेतत्त्वावर घर घेऊन राहत होती. 

दरम्यान, शुक्रवारी (दि. १५) अजय हा शामलकडे गेला. आपण एकत्र राहू, असे म्हणत शामल हिला चित्रपटासाठी घेऊन गेला. तसेच बाहेर जेवण केले. त्यानंतर शनिवारी शामल पुन्हा मैत्रिणीसोबत चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. आपण कालच चित्रपटाला गेलो होतो. त्यामुळे आज त्याच चित्रपटासाठी का जातेस, असे अजयने विचारले. मात्र, त्यानंतरही शामल घरातून बाहेर पडली. दरम्यान, तिची मैत्रीण घरीच असल्याचे दिसून आल्याने अजय याचा संशय बळावला. 

चित्रपट पाहून रात्री घरी परतल्यानंतर शामल आणि अजय यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर रविवारी पहाटे त्याने शामल हिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यास शामलने विरोध केला. याचा राग आल्याने अजयने नाक व तोंड दाबून शामलचा खून केला. 

खून करून केले मद्यपान

रविवारी पहाटे खून केल्यानंतर अजयने मद्यपान करून त्याच्या दुकानात थांबला होता. दरम्यान शामलची मैत्रीण तिच्या घरी आली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अजयला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याचे पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी