शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संशयित दहशतवादी सर्फराज मेमन ताब्यात; इंदूरमध्ये कसून चौकशी, जबानी बदलण्याने संशय बळावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 06:39 IST

पाचव्या इयत्तेपर्यंत शिकलेला सर्फराज १२ वर्षे हाँगकाँगमध्ये राहत होता. तो अस्खलित इंग्रजी, हिंदी आणि चिनी भाषेत संभाषण करतो.

- आशिष सिंहलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (एनआयए) सूचनेमुळे तपासयंत्रणांच्या रडारवर आलेला संशयित दहशतवादी सर्फराज मेमन याला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिस तेथे त्याची चौकशी करीत आहेत. मात्र, वारंवार जबानी बदलत असल्याने त्याच्यावरील संशय वाढला आहे.

पाचव्या इयत्तेपर्यंत शिकलेला सर्फराज १२ वर्षे हाँगकाँगमध्ये राहत होता. तो अस्खलित इंग्रजी, हिंदी आणि चिनी भाषेत संभाषण करतो. इंदूरच्या पोलिस गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त रजत सकलेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीत बेनामी ई-मेलबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, त्याचे दोन विवाह झाले असून दुसरी पत्नी चिनी आहे. गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या पत्नीसोबत त्याचे वाद होत होते. त्याचमुळे कदाचित त्याला अडकवण्यासाठी तिने एनआयएला हा मेल पाठवला असावा. याबाबत खातरजमा करण्यासाठी तपासयंत्रणा चीनमधील वकिलांशी संपर्क साधत आहे.

उपायुक्त सकलेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्फराजकडून जप्त करण्यात आलेला पासपोर्ट हाँगकाँगचा असून तो त्याला २००६ साली देण्यात आला होता. त्यावर चीन आणि हाँगकाँगला भेटी दिल्याचे शिक्केही आढळले आहेत. चौकशीत सरफराजने सांगितले की, तो हाँगकाँग येथे वर्किंग व्हिसावर काम करीत होता. त्याचदरम्यान पासपोर्टची मुदत संपल्याने स्थानिक प्रशासनाकडून त्याने पासपोर्टचे नूतनीकरण केले.

मात्र, तपासयंत्रणांनी त्याच्याकडे जुना पासपोर्ट मागितला तेव्हा तो आपल्याकडे नसल्याचे सांगत त्याने पाकिस्तानला भेट दिल्याचेही नाकारले. इंदूर गुप्तचर विभागाने आता पासपोर्ट कार्यालयाकडून त्याच्या जुन्या पासपोर्टचा तपशील मागवला आहे. त्याचप्रमाणे हाँगकाँग आणि चीनकडून त्याच्या अन्य देशांच्या वारीची माहितीही मागविली आहे.

टॅग्स :terroristदहशतवादी