शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत महिलेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:51 IST

सुप्रीम कॉलनीत राहणाºया अनिता राज राजपूत (वय ३१) या महिलेचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देसलग दुस-या दिवशी संशयास्पद मृत्यूपाच वर्षापासून एकटीच राहत होती शहरातमृतदेह घेण्यास कोणी तयार होईना

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २७ : सुप्रीम कॉलनीत राहणा-या अनिता राज राजपूत (वय ३१) या महिलेचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.शेजारच्यांनी दवाखान्यात हलविलेयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  गेल्या आठवड्यापासून अनिता राजपूत ही महिला आजारी होती व दोन दिवसापूर्वीच तिची दवाखान्यातून सुटका झाली होती. मंगळवारी पुन्हा प्रकृती खालावल्याने शेजारच्या लोकांनी तिला खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले, तेथे डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्यात सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात येत असताना रस्त्यातच या महिलेची प्राणज्योत मालवली. वैद्यकिय अधिकारी डॉ.विसपुते यांनी अनिता यांना मृत घोषीत केले.

मूळची खामगाव येथील रहिवासीअनिता राजपूत ही महिला मुळची खामगाव येथील असल्याचे शेजारच्यांनी सांगितले. सुकलाल पूनमचंद राजपूत यांच्या घरात पाच वर्षांपासून ती एकटीच भाड्याने राहत होती.जळगाव शहरात तिचे कोणीच नातेवाईक नाहीत. पाच वर्षात तिला कोणीच भेटायला देखील आले नव्हते. जिल्हा रुग्णालयात मृतदेह आल्यानंतर हेडकॉन्स्टेबल संजय पाटील व अशपाक शेख या दोघांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली, मात्र अनिताचे कोणीही नातेवाईक नसल्याने मृतदेह घ्यायला कोणीही तयार होत नव्हते.