शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुश्मिता सेनला प्राप्तिकर प्रकरणात दिलासा; न्यायाधिकरणाचा निवाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 03:08 IST

सुश्मिताने प्रमोशनचे काम करताना कोका कोला कंपनीच्या अधिका-याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला व यामुळेच काम बंद केल्याचे सांगितले.

मुंबई : एखाद्या व्यक्तीस लैंगिक छळाबद्दल मिळालेली भरपाईची रक्कम उत्पन्नात मोडत नाही. त्यामुळे अशा रकमेवर प्राप्तिकरही लागू होत नाही, असा निवाडा देत प्राप्तिकर अपिली न्यायाधिकरणाने चित्रपट अभिनेत्री व मॉडेल सुश्मिता सेन हिला गेली १५ वर्षे सुरु असलेल्या वादात दिलासा दिला आहे.सन २००२-०३ मध्ये सुश्मिता सेनला कोका कोला कंपनीकडून १.४५ कोटी मिळाले. पुढील वर्षाचे प्राप्तिकराचे रिटर्न भरताना सुश्मिताने ५० लाख रुपये उत्पन्नात दाखविले. कर निर्धारण अधिकाऱ्याने रिटर्न अमान्य करून प्राप्तिकर भरायला सांगण्याखेरीज सुश्मिताला ३५ लाखांचा दंडही लावला.याविरुद्ध सुश्मिताने केलेल्या अपिलावर प्राप्तिकर अपिली न्यायाधीकरणाच्या शक्तिजीत डे व मनोज कुमार अगरवाल यांच्या खंडपीठाने काही दिवसांपूर्वी निकाल दिला. संबंधित वर्षातील जास्तीची करआकारणी व दंड रद्द केला.१.५० कोटीपैकी एक कोटी दिल्यावर तिने कराराचे पालन करत नसल्याचा आरोप करून कंपनीने करार एकतर्फी रद्द केला. एक कोटी रुपये परत करण्याची मागणी केली. सुश्मिताने प्रमोशनचे काम करताना कोका कोला कंपनीच्या अधिका-याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला व यामुळेच काम बंद केल्याचे सांगितले. कालांतराने दोघांत समेट झाला. कंपनीने तिला दिलेले एक कोटी परत मागण्याऐवजी उलट तिलाच १.४५ कोटी देऊन प्रकरण मिटवले.निकालात काय म्हटले?न्यायाधिकरणाने म्हटले की, करारानुसार सुश्मिताला कोका कोला कंपनी आणखी फक्त ५० लाख रुपयेच देणे लागत होती. असे असताना करारभंगाबद्दल दिलेले एक कोटी रुपयेही परत मागणाºया कंपनीने सुश्मिताला १.४५ कोटी रुपये देऊन समेट केला यावरून स्पष्ट दिसते की, ५० लाखांहून जास्तीचे ९५ लाख रुपये कंपनीने सुश्मिताला तिने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाची मांडवली करण्यासाठी दिले होते. त्यामुळे या १.४५ कोटीपैकी फक्त ५० लाख त्या वर्षात सुश्मिताच्या व्यावसायिक उत्त्पन्नाच्या खाती धरायला हवेत. बाकीचे ९५ लाख भरपाईपोटी मिळाल्याने ते उत्त्पन्नात येत नाहीत व त्यावर प्राप्तिकरही लागू होत नाही.

टॅग्स :Sushmita Senसुश्मिता सेन