शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Sushil Kumar : सुशील कुमारला फासावर लटकवा, तो राजकीय दबाव वापरू शकतो; सागर राणाच्या कुटुंबीयांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 14:02 IST

Sushil Kumar should be hanged : He can use his political links to influence investigation: Sagar Rana's parents ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार ( Sushil Kumar) याची ६ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे.

Sushil Kumar should be hanged : ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार ( Sushil Kumar) याची ६ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. २३ वर्षीय कुस्तीपटू सागर धनकडच्या हत्येप्रकरणी सुशीलला पोलिसांनी अटक केले. या प्रकरणी योग्य तपास व्हावा अशी मागणी सागरच्या कुटुंबीयांनी केली आहे. सुशील या प्रकरणात त्याच्या राजकीय ओळखींचा वापर करू शकतो, अशी भीती सागरच्या कुटुंबीयांना वाटत असून त्यांनी सुशीलला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे.  Sushil Kumar should be hanged : He can use his political links to influence investigation: Sagar Rana's parents

सागरच्या हत्येनंतर 17 दिवसांपासून फरार असलेल्या सुशीलला (Sushil Kumar) दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्याला दिल्ली न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी सुशील कुमारच्या साथीदारालादेखील अटक केली आहे. हत्येप्रकरणी कोर्टानेही तपास करावा जेणेकरुन सुशील कुमार आपल्या राजकीय ओळखी वापरत पोलीस तपासात अडथळा आणणार नाही अशी मागणी सागर राणाचे वडील अशोक यांनी केली आहे.   ''हा गुरु म्हणण्याच्या पात्रतेचा नाही. त्यानं जिकंलेली सर्व पदकं काढून घेतली पाहिजेत. पोलीस योग्य तपास करतीलच, परंतु सुशील त्याचा राजकीय प्रभाव वापरू शकतो, ''असं सागर राणाच्या आईने  म्हटले आणि त्यांनी सुशीलला फाशी देण्याची मागणी केली आहे. सागरचे वडील अशोक हे  बेगमपूर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी सुशीलच्या गुन्हेगारी संबंधांचाही तपास करण्याची मागणी केली आहे.  ''आम्ही न्यायाची अपेक्षा करत आहोत. फरार झाल्यानंतर तो कुठे होता? त्याला आसरा कोणी दिला? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या गँगस्टरसोबत त्याचे संबंध आहेत. त्याला फासावर लटकवलं पाहिजे म्हणजे लोकांना धडा मिळेल,'' असंही ते म्हणाले. 

ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती. पोलिसांचा ससेमिरा चुकवून अज्ञातस्थळी दडून बसलेल्या सुशीलचा शोध घेणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. याशिवाय सुशीलचा खासगी सचिव अजय हा देखील फरार असून, त्याला शोधून देणाऱ्यास ५० हजारांचा रोख पुरस्कार दिला जाणार होता. सुशील कुमारचा खाजगी सचिव अजय कुमारला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सुशील कुमारला 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्य़ाची मागणी करण्यात आली. मात्र, सुशीलच्या वकिलांनी यास विरोध केला. सुशील कुमारने हत्या केली त्या दिवशी एकूण पाच जणांना उचलून आणण्यात आले होते. त्यांना छत्रसाल स्टेडिअममध्ये आणून जणावरांसारखी मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या सर्व कटाचा तपास करण्य़ासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच आरोपी सुशील कुमारचे असोदा गँगशी संबंध असल्याचे सांगितेले जात आहे. सोनू नावाचा जखमीदेखील एका गँगचा आहे, यामुळे या कटाचा तपास करण्यासाठी ही कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. 

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारWrestlingकुस्ती