शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी प्रकरण: आणखी एका आरोपीस उत्तर प्रदेशातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 04:30 IST

केडीएमसीचे भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली आणखी एका आरोपीला ठाणे खंडणीविरोधी पथकाने उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले.

कल्याण : केडीएमसीचे भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली आणखी एका आरोपीला ठाणे खंडणीविरोधी पथकाने उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले. याप्रकरणी नगरसेवक महेश पाटीलसह त्याचे साथीदार न्यायालयीन कोठडीत असून उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.१३ डिसेंबर रोजी ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सात जणांना दरोड्याच्या तपासात अटक केली होती. या आरोपींकडे केलेल्या तपासात नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी नगरसेवक महेश पाटील याने दिल्याची माहिती उघडकीस आली. याप्रकरणी २१ डिसेंबर रोजी महेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. मे महिन्यात याच प्रकरणात आरोपींना हत्यारे पुरवणाऱ्या अनिल मुळेला अटक करण्यात आली होती. यामध्ये राजेश पटेल याचादेखील सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा शोध सुरू असतानाच उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली. ठाणे खंडणीविरोधी पथकाने त्याचा ताबा घेतला.- कुणाल पाटील हत्येच्या सुपारी प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात राजेश पटेलचा सहभाग नेमका काय आहे, हे तपासाअंतीच निष्पन्न होईल, असे ठाणे खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी संदेश गावंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Arrestअटकthaneठाणे