शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महाठग सुकेश चंद्रशेखरचं पुन्हा पत्र; वाढदिवसाला 'त्या' कैद्यांना ५ कोटी दान करण्याची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 12:47 IST

सुकेशने याआधी पत्र लिहून जेलमध्ये मनिष सिसोदिया यांना VVIP ट्रिटमेंट मिळत असल्याचं म्हटलं. या ट्रिटमेंटची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्याने केली.

नवी दिल्ली - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा पत्रामुळे चर्चेत आला आहे. यावेळी वाढदिवसानिमित्त सुकेशने डीजींना पत्र लिहून महादान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुकेश चंद्रशेखरनं सहकारी कैद्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २५ मार्चला होणाऱ्या वाढदिवसासाठी सुकेशने डीजींना पत्र पाठवले आहे. 

या पत्रात सुकेश चंद्रशेखरने सहकारी कैद्यांना ५ कोटी ११ लाख रुपये दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यात ज्या गरीब कैद्यांकडे जामिनासाठी पैसे नाहीत, पैसे नसल्याने ते कित्येक वर्ष जेलच्या कोठडीत आहेत. जे घरातील मुख्य व्यक्ती आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले आहे. मुलांचे शिक्षण थांबले आहे अशा कैद्यांना ही रक्कम देण्याची विनंती डीजींना पत्राद्वारे केली आहे. 

त्याचसोबत सुकेशने याआधी पत्र लिहून जेलमध्ये मनिष सिसोदिया यांना VVIP ट्रिटमेंट मिळत असल्याचं म्हटलं. या ट्रिटमेंटची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्याने केली. CM अरविंद केजरीवाल मनिष सिसोदियांबाबत खोटी माहिती देत आहेत. मनिष सिसोदिया असुरक्षित असल्याचा दावा केजरीवाल करतायेत हे चुकीचे आहे. मनिष सिसोदिया जेल नंबर १ च्या ९ वार्डात आहेत जे तिहार जेलमधील सर्वात मोठा VVIP वार्ड आहे असा दावा सुकेशने पत्राद्वारे केला. 

आरोपी सुकेश चंद्रशेखरने त्याचा खटला दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करावा अशी विनंती केली आहे. त्याबाबत कोर्टात याचिका दाखल करत न्यायाधीशांवरच आरोप केले. मात्र पटियाला हाऊस कोर्टाने सुकेशच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. त्याचसोबत न्यायाधीशांवर केलेल्या आरोपावरूनही कोर्टाने कैदी सुकेशला फटकारले. सध्या कोर्टाने सुकेश चंद्रशेखरच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मार्चपर्यंत वाढ केली आहे. 

आम आदमी पार्टीला ६० कोटी रुपये दिलेयाआधी सुकेशनं अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीवर आरोप केलेत. सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर राज्यसभेच्या एका जागेच्या बदल्यात ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर सुकेश चंद्रशेखरने अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्योगपतींना त्यांच्या पक्षाशी जोडून ५०० कोटी रुपये गोळा केल्याचा आरोपही केला. त्या बदल्यात आम आदमी पार्टीकडून कर्नाटकात मोठ्या पदाची ऑफर दिल्याचा आरोप सुकेश चंद्रशेखरने केला होता.