शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून गोळी झाडून व्यावसायिकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 03:03 IST

कर्जाला कंटाळून स्वत:च्या गाडीतच डोक्यात गोळी झाडून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना काळाचौकी येथे शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.

मुंबई : कर्जाला कंटाळून स्वत:च्या गाडीतच डोक्यात गोळी झाडून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना काळाचौकी येथे शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.काळाचौकी परिसरात खटाव चाळीत अश्विन ललित कुमार जैन (४०) हे पत्नी आणि मुलासोबत राहायचे. ते सोन्याच्या खरेदी-विक्री व्यवसायाशी संबंधित होते. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास दागिने, घड्याळ घरीच सोडून ते बाहेर गेले. त्यानंतर काही वेळाने त्यांचा मोबाइल बंद झाला. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या वडिलांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास येथील साईबाबा मार्ग येथे पार्क केलेल्या पिवळ्या रंगाच्या कारमध्ये ते निपचित पडलेले दिसले. काळाचौकी पोलीस तेथे दाखल झाले तेव्हा उजव्या हातात रिव्हॉल्व्हर होती. त्यांनी डोक्यात गोळीत झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांना केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.घटनास्थळी सुसाईड नोट मिळालेली नाही. प्राथमिक तपासात कर्जाच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करीत आहेत. त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर वडिलांच्या नावावर असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्यांच्या वडिलांचा काळबादेवी परिसरात भांडी विक्रीचा व्यवसाय आहे.मित्रांना पाठवले संदेशआत्महत्येपूर्वी जैन यांनी काही मित्रांना संदेश पाठवले. त्यानंतर मोबाइल बंद केला. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्या