शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 16:52 IST

Suicide of accused accused of molestation : विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या ५५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सावत्र मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या ५५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी जलंब पोलिसस्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच संबंधिताने आत्महत्या केल्याने, वाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.- वाडी येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या सावत्रबापाविरोधात विनयभंग केल्याची तक्रार शहर पोलिसांत केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी रविवारी ५५ वर्षीय सावत्र बापाविरोधात  भादंवि कलम ३५४, ३५४ अ, ३२३, ५०४, ५०६ आणि पोक्सो अ‍ॅक्ट २०१२ सहकलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीच्या शोधात पोलिस असतानाच, विनयभंगाच्या आरोपीने जलंब पोलिस स्टेशनच्या हद्दीत गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, आत्महत्या केलेल्या इसमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात आणण्यात आला. या घटनेची माहिती संबंधित इसमाच्या नातेवाईकांना मिळताच, तक्रारदार मुलगी, तिची आई आणि तिच्या नातेवाईकांमध्ये वाद विवाद झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमधील वाद मिटविला. यापूर्वीही केला होता विनयभंगाचा प्रयत्न!विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या इसमाने यापूर्वीही असाच प्रयत्न यापूर्वीही केला होता. त्यावेळी तब्बल सात दिवस तो घराबाहेर होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो मिळून न आल्याने रात्री पोलिसांनी शोध मोहिम थांबविली. अखेर मंगळवारी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.  या इसमाची आत्महत्या चुकीच्या आरोपातून की पश्चातापातून अशी चर्चा आता परिसरात रंगली आहे.
टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी