शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवर मैत्रीण झाली सुहाना, मोबाईल घेऊन पसार होत लावला चुना

By गौरी टेंबकर | Updated: October 27, 2023 16:46 IST

हा प्रकार मालाड पश्चिम परिसरात घडला असून बांगुर नगर पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई: अवघ्या दोन आठवड्यापूर्वी इंस्टाग्रामवर सुहाना नावाच्या मुलीची फ्रेंडशिप रिक्वेस्ट मिळाली. ती पॉलिसी विकणाऱ्या कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजरने एक्सेप्ट केली. त्यानंतर ती भेटायलाही आली आणि बोलण्यात गुंतवत त्याचा मोबाईल घेऊन पसार झाली. हा प्रकार मालाड पश्चिम परिसरात घडला असून बांगुर नगर पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार अब्दुल ( नावात बदल) याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो २५ ऑक्टोबर रोजी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला सुहाना या नावाचा आयडीवरून मालाड पश्चिम च्या इन्फिनिटी मॉलमध्ये भेटण्यासाठी मेसेज आला होता. त्याच्या दोन आठवड्यापूर्वी याच आयडीवरून आलेली रिक्वेस्ट त्याने एक्सेप्ट केल्यानंतर अब्दुल आणि सदर खातेधारक एकमेकांशी चॅटिंग करत होते. सुहानाने भेटायला बोलवल्यानंतर संध्याकाळी साडे चारच्या सुमारास अब्दुल त्या ठिकाणी पोहोचला. तेव्हा मॉल समोर सुहाना आणि तिची मैत्रिणी बुरखा परिधान करून उभ्या होत्या. हे सर्व भेटल्यावर मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांनी फूड कॉर्नर हॉटेलमध्ये जेवण ऑर्डर केले.

काही वेळाने  त्या दोघींमध्ये अज्ञात कारणावरून शाब्दिक वाद सुरू झाला आणि सुहानासोबत असलेली महिला तिथून रागाने निघून गेली. तिला फोन करण्यासाठी सुहानाने अब्दुलकडे त्याचा मोबाईल मागितला जो त्याने तिला दिला. मोबाईल दिल्यावर फोनवर बोलत बोलत सुहाना तिथून पसार झाली. ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिचा पाठलाग केला मात्र ती सापडलीच नाही. अब्दुलने तिची वाट पाहिली तसेच दिवसभर शोध घेतला आणि अखेर २६ ऑक्टोबर रोजी बांगुरनगर पोलिसात धाव घेत तक्रार केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई