शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कट्टरतावाद प्रशिक्षणामुळेच जुनेद बनला आतंकवादी!, घरची परिस्थिती हलाखीची

By अनिल गवई | Updated: August 30, 2022 15:43 IST

तालुक्यातील गोंधनापूर येथील मुळचा रहिवासी असलेला आणि महाराष्ट्र दहशातवाद विरोधी पथकाने पुण्यातून अटक केलेला मो. जुनेद हा कट्टरतावाद  प्रशिक्षणामुळेच आतंकवादी बनला

खामगाव: 

तालुक्यातील गोंधनापूर येथील मुळचा रहिवासी असलेला आणि महाराष्ट्र दहशातवाद विरोधी पथकाने पुण्यातून अटक केलेला मो. जुनेद हा कट्टरतावाद  प्रशिक्षणामुळेच आतंकवादी बनला असल्याचे समोर येत आहे. गोंधनापूर (ता. खामगाव) येथे वास्तव्यास असताना दोन वेगवेगळ्या वेल्डींग वर्कशॉपमध्ये तो काम करीत होता. दरम्यान, पुणे येथे बहिणीकडे वास्तव्याला असतानाच तो कट्टरवाद प्रशिक्षणासाठी गेल्याचेही आता समोर येत आहे. तथापि, जुनेदकडून त्याच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळत नसल्याची चर्चा आहे.

पुणे येथे वास्तव्यास असताना मो. जुनेद मो. अता जम्मू-काश्मिरातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या संपर्कात आला. या संघटनेकडून ठराविक वेळेत त्याला कट्टरतावादाचे प्रशिक्षण देण्यात आले. कट्टरता वादाच्या प्रशिक्षणानंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याने वेगवेगळे अकाऊंट तयार केले. बनावट सोशल मिडीया प्रोफाईलद्वारे तो दहशतवादी सहकाºयांच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा गावाशी आणि कुटुंबियांशी संपर्क तुटल्याचे समोर येत आहे. गावातील शेजाºयांनाही मो. जुनेद याच्याबाबतीत फारशी माहिती नाही.

सुटाळा, एमआयडीत केले ‘वेल्डींग’!- गोंधनापूर येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मो. जुनेद याने खामगावात माध्यमिक शिक्षण घेतले. दहावीपर्यंतचे शिक्षण खामगावातील एका नामांकित शाळेत घेतले.  उपजिविकेसाठी तो सुटाळा येथील एका वेल्डींग वर्कशॉपमध्ये काम करायचा. त्यानंतर एमआयडीसीतील एका वेल्डींग वर्कशॉपमध्ये काही काळ त्याने काम केले. या कालावधीत  एमआयडीसीतील एका प्रसिध्द कंपनीच्या गेटचे वेल्डींगही त्याने केले होते. दरम्यान, पुणे येथे बहिणीकडे गेला. तेथे वास्तव्यास असताना दहशातवाद्यांच्या संपर्कात आला.

उत्तर प्रदेश पोलीसांच्या केले स्वाधीनदहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या मो. जुनेद याला २४ मे रोजी पुण्यातून अटक करण्यात आली. गत आठवड्यात त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर मो. जुनेदला उत्तर प्रदेश पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी गत सहा-सात महिन्यांपासून अकोला दहशतवाद विरोधी पथकाची चमू अतिशय गुप्तपणे काम करीत होती.

टॅग्स :terroristदहशतवादी