शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत बापलेकीच्या नात्याला काळिमा; सावत्र बापाचा दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

By नितीन पंडित | Updated: December 27, 2023 14:20 IST

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी

भिवंडी:  २४ वर्षीय सावत्र बापाने १० वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी समोर आली आहे.या घटनेने नराधम सावत्र बापाने बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने नराधमा विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी नाराधमास अटक केली आहे.

तालुका पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटने प्रकरणी सुरुवातीला २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी सावत्र बापाने ३ अज्ञातांनी मुलीला गाडीत टाकून तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावच्या डोंगरावर नेवून तिच्यावर अतिप्रसंग करून तिला घरी आणून सोडल्याची बनावट बतावणी केली होती.

त्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले आणि तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी गणेशपुरी पोलिसांच्या मदतीने ६ पोलीस पथके तयार करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे कसून तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी अल्पवयीन पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर नराधम सावत्र बापानेच अत्याचार केल्याचे पीडितेने कथन केले.        पोलिसांनी सावत्र बापाची कसून चौकशी केल्यानंतर नराधम सावत्र बापाने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास २४ वर्षीय नराधम बापाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात विविध कलमान्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मंगळवारी त्यास न्यायालयात हजर केले असता २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.