शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजा करण्यासाठी चोरी; अनेक मंदिरांमध्ये डल्ला मारल्याची चोरट्याने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 09:05 IST

ठाणे पूर्व साईनाथ नगरातील हनुमान मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरट्याने दिवसाढवळ्या मंदिराची दानपेटी फोडून रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता.

ठाणे : मौजमजेसाठी  विविध मंदिरांत चोरी करणाऱ्या चोराला चोरी करतानाच ठाणे पूर्व येथे नागरिकांच्या सहकार्याने कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. मंदिरात चोरी करण्यापूर्वी संपूर्ण मंदिराची रेकी ओम सातपुते करत असे. त्याच्याजवळ चाव्यांचा जुडगा असून, मास्टर चावीला तेल लावून दानपेटीचं कुलूप तो उघडत असल्याचे तपासात पुढे आले आहे. स्वत:च्या चैनीसाठी अनेक मंदिरांत चोऱ्या केल्याचेही समोर आले आहे. चौकशीत  त्याने यापूर्वी ठाणे, कल्याण, डोंबिवली, माणगाव, नाशिक पुणे शहरात मंदिरात चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. 

ठाणे पूर्व साईनाथ नगरातील हनुमान मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरट्याने दिवसाढवळ्या मंदिराची दानपेटी फोडून रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चोरीची पूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेज चित्रित झाली आणि चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसून आला. पोलिस या चोरट्याचा मागावर होते. दरम्यान, मंदिरातील दानपेटीतील रक्कम सुलभपणे चोरी करता येत असल्याने, ओम सातपुते (वय ३८) ठाणे पूर्व आदर्शनगर सत्पशृंगी मंदिरात चोरी करण्याच्या प्रयत्नात होता. संशयितरीत्या त्याच्या हालचाली बघून नागरिकांनी त्याला हटकले, यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी त्याला ओळखून ताब्यात घेतले. कोपरी पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यावर ओम याने हनुमान मंदिरातील चोरीची कबुली दिली, अशी माहिती कोपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर हुंबे यांनी दिली.  चोरीचे गुन्हे करताना, तो एकटा आहे की, अजून त्याचे साथीदार आहेत, याचा शोध कोपरी पोलिस घेत आहेत.

नवी मुंबईतील घणसोली येथील हनुमानाच्या मंदिरातील दानपेटी चोरल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरटे दानपेटी चोरून घेऊन जाताना सीसीटीव्हीत दिसून आले आहेत. त्याद्वारे रबाळे पोलिस अधिक तपास करत आहेत. घणसोली घरोंदा येथील हनुमानाच्या मंदिरात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. मंदिरालगत असलेल्या मैदानात सकाळी काहीजण गेले असता त्यांना दानपेटी आढळून आली. याबाबत त्यांनी पोलिस आणि संबंधितांना माहिती दिली. यावेळी दानपेटीची चोरी  झाल्याचे उघड झाले. यामुळे परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दानपेटी चोरून ती फोडून त्यामधील रक्कम नेल्याचे उघड झाले. मात्र, चिल्लरला हात लावला नाही. रहिवासी सोसायटीत हे मंदिर असून, एका संस्थेमार्फत ते हाताळले जात आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्याठिकाणी ही घटना घडली, त्या मैदानात रात्रीच्या वेळी गर्दुल्यांचा वावर असतो. यापूर्वी तिथे टोळक्यांमध्ये हाणामारीच्यादेखील घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नागरिकांकडून संशय व्यक्त होत आहे.