शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसात अवैध दारु अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र

By अजित मांडके | Updated: July 25, 2024 16:56 IST

पावसाचा फायदा घेत हातभट्टी सुरु करणाऱ्यांना दणका: गावठी दारुसह २० लाखांचा मुद्देमाल नष्ट

ठाणे: एकीकडे मुसळधार पाऊस सुरु असतानाच प्रशासन गाफील असल्याचा समज करुन हातभट्टीची गावठी दारुची निर्मिती करणाऱ्या माफियांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने चांगलाच दणका दिला आहे. भरारी पथकांसह विविध विभागांनी याठिकाणी धाड भिवंडी आणि देसाई खाडी परिसरात धाड टाकून गावठी दारु आणि दारु निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनासह २० लाख ४५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी गुरुवारी दिली. 

ठाण्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. याचाच फायदा घेत गावठी दारुची निर्मिती करणाऱ्या माफियांनी भर पावसातच हातभट्टीची दारु निर्मिती सुरु केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त पवार यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या  विशेष खाड़ी कामासाठी प्रशिक्षित जवानांनी २४ जुलै २०२४ रोजी ठाणे जिल्ह्यातील देसाई आणि भिवंडी खाडी परिसरात धाडसत्र राबवून हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवलेल्या धाडसत्र मोहिमेच्या अनुषंगाने  उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखली कोकण विभागीय भरारी पथक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि भिवंडीतील निरीक्षकांच्या विविध पथकांनी  भिवंडी आणि देसाई खाडी परिसरातील हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धाडसत्र राबविले. 

या धाडीत रसायनांचे सुमारे २०० ड्रम्स उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये २२ गुन्हे दाखल केले असून १३ गुन्हे बेवारस अड्डयांच्या मालकांविरुद्ध दाखल केले आहेत. या कारवाईमध्ये  १४२ लीटर हातभट्टी दारू आणि ५३ हजार लीटर रसायन तसेच इतर साहित्य मिळॅून २० लाख ४५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. 

खाडीमध्ये धाडसी कारवाईया कारवाईच्या मोहिमेमध्ये  बोटीमधून जाऊन  खाडीतील हातभट्टी निर्मितीची अड्डे  उद्ध्वस्त केली आहेत.  देसाई गाव, शांतीनगर, सरलाबे, गोरपे गाव, कुंभार्ली गांव आणि भिवंडी तसेच इतर ठिकाणी हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे चालविणाऱ्यांचा  शोध घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ३२८ नुसार  गुन्हे दाखल करण्याच्या तसेच एमपीडीए  कायद्यान्वये कारवाई करण्याच्या आदेशही उपायुक्त पवार यांनी दिले आहेत.  यानंतरही अशा कारवाई चालूच ठेऊन हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे समूळ नष्ट करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे