सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन संदर्भात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक झाली होती. आता रिया जामिनावर जेलबाहेर आली आहे. आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने तिची शेजारी डिंपल थवाणी हिच्याविरूद्ध सीबीआयकडे लेखी तक्रार केली आहे. रिया हिने डिंपलविरोधात कारवाई करण्याची मागणी सीबीआयला केली आहे. रिया म्हणाली आहे की, तिच्यावर खोटे आणि बनावट आरोप लावण्यात आले होते. या तक्रारीत रिपब्लिक टीव्हीचेही नाव आहे, याबाबत माहिती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. रियाच्या शेजारी असलेल्या डिंपलने असा दावा केला होता की, 13 जूनच्या रात्री सुशांत सिंग राजपूत रिया सोडण्यासाठी तिच्या इमारतीत आला होता. 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूत मुंबईच्या वांद्रे येथे एका घरात मृतावस्थेत आढळला. सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करीत आहे. सीबीआय चौकशीत डिंपल हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत असा अनेक माध्यमांच्या वृत्तांत दावा केला गेला आहे.
SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार
By पूनम अपराज | Updated: October 12, 2020 21:06 IST
SSR Case : या तक्रारीत रिपब्लिक टीव्हीचेही नाव आहे, याबाबत माहिती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.
SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार
ठळक मुद्देरियाच्या शेजारी असलेल्या डिंपलने असा दावा केला होता की, 13 जूनच्या रात्री सुशांत सिंग राजपूत रिया सोडण्यासाठी तिच्या इमारतीत आला होता.