शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! अभिनेत्रीच्या कपड्यांवर आढळले स्पर्म; आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणाला नवं वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 11:13 IST

पोलीस आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणी आरोपी समर सिंह, संजय सिंह, संदीप सिंह आणि अरुण पांडे यांचे डिएनए नमुने घेऊन पुढील तपास करेल

लखनौ - वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला होता. आकांक्षाच्या अचानक मृत्यूने अनेक प्रश्न उभे राहिले ज्याची अद्याप उत्तरे सापडली नाहीत. कथितपणे अभिनेत्री आकांक्षाने आत्महत्या केल्याचं बोलले जाते परंतु अद्याप तिच्या मृत्यूचे गुढ उकलले नाही. या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. पण आता या प्रकरणी नवीन खुलासा समोर आला आहे.

घटनेच्या दिवशी अभिनेत्रीच्या अंगावर असलेल्या कपड्यांची तपासणी केली असता लॅबमधून त्याचा रिपोर्ट आला आहे. ज्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळेल. आकांक्षाच्या अंडरगारमेंट्सवर स्पर्म आढळले आहे. या खळबळजनक रिपोर्टनंतर आरोपी समर सिंह, संजय सिंह यांच्यासह ४ जणांची DNA चाचणी करण्यात येणार आहे. पोलिसांनी याबाबत कोर्टात आरोपींच्या डिएनए चाचणीसाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

पोलीस आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणी आरोपी समर सिंह, संजय सिंह, संदीप सिंह आणि अरुण पांडे यांचे डिएनए नमुने घेऊन पुढील तपास करेल. समर सिंह आणि संजय सिंह हे अभिनेत्री आकांक्षा दुबे हिला आत्महत्येसाठी उकसावल्याचा आरोपाबद्दल जेलमध्ये आहेत. संदीप सिंहसोबत आकांक्षाला शेवटचे पाहिले गेले. आत्महत्येपूर्वी आकांक्षा एका पार्टीतून परतली होती. 

कुटुंबाची एकच मागणी    याआधी वकील शशांक त्रिपाठी यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी करतो की आकांक्षा दुबे मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवावा. आकांक्षाच्या कुटुंबाला वाराणसी पोलिसांवर भरवसा नाही. गायक समर सिंहने आकांक्षाला त्रास दिला असा आरोप तिच्या आईचा आहे. त्याचसोबत आकांक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा दावाही कुटुंबाने केला आहे. 

आकांक्षा दुबेचे चित्रपटसमर सिंह हा आकांक्षा दुबेच्या कथित आत्महत्या प्रकरणातील आरोपी आहे. वाराणसी पोलीस आणि गाझियाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला अटक केली. २५ वर्षीय अभिनेत्री आकांक्षा दुबे २६ मार्च रोजी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली होती. तिने 'कसम पैदा करने वाले की २', 'मुझसे शादी करोगी' आणि 'वीरोन'सह अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.