शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सोनमला बांगलादेशला घेऊन गेले असतील; शिलाँगला हनिमूनला गेलेल्या नवदाम्पत्याबाबत मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:59 IST

Raja Sonam Suryavanshi Indore Couple: कुटुंबाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच राजाच्या अंत्ययात्रेदरम्यान कुटुंबासह इतर लोकांनी 'राजा रघुवंशी ला न्याय हवाय' अशा घोषणा दिल्या आहेत.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याने तेथील ट्रिप रद्द करून मेघालयच्या शिलाँगला हनिमूनला गेलेल्या इंदोरच्या राजा आणि सोनम या नवदाम्पत्याबाबत रहस्य अद्याप उलगडलेले नाही. राजाचा मृतदेह दरीत सापडला असून त्याच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. परंतू, सोनम अद्याप बेपत्ता आहे. तिला बांगलादेशला घेऊन गेले असतील असा दावा राजाच्या भावाने केला आहे. 

राजाचा भाऊ विपिन रघुवंशीने गंभीर आरोप केले आहेत. ज्या भागात राजाचा मृतदेह सापडला, त्यांची स्कूटर सापडली त्या भागात यापूर्वीही अनेक जोडपी गायब झालेली आहेत, असा आरोप विपिनने केला आहे. तसेच लुटमारीच्या उद्देशाने आपल्या भावाला मारण्यात आले आणि त्याची पत्नी सोनमला बांगलादेशच्या लोकांनी आपल्यासोबत नेले असण्याची भीती त्याने व्यक्त केली आहे. शिलाँग पोलिस पहिल्या दिवसापासूनच त्याच्या भावाचा आणि पत्नीचा शोध घेण्यात कुचराई करत होते. यामुळे त्याच्या भावाची हत्या झाल्याचा आरोप विपिनने केला आहे. 

तिथे कोणतीही व्यवस्था नाही. भावाच्या अंत्यसंस्कारानंतर मी पुन्हा शिलाँगला जाणार आहे. आमच्या घरची सून आजही बेपत्ता आहे, तिचा शोध घेणार आहोत, असे विपिनने सांगितले आहे. 

कुटुंबाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच राजाच्या अंत्ययात्रेदरम्यान कुटुंबासह इतर लोकांनी 'राजा रघुवंशी ला न्याय हवाय' अशा घोषणा दिल्या आहेत. राजाची ट्री कटरने हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र देखील जप्त केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

इंदूरचा राजा रघुवंशी आणि पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला रवाना झाले. दोघेही सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते. त्यानंतर अचानक दोघांचेही फोन बंद झाले. यामुळे इंदूरमधील त्यांचं कुटुंब खूप अस्वस्थ झालं. यानंतर, कुटुंबातील काही सदस्य स्वतः शिलाँगला पोहोचले. मात्र तरी राजा आणि सोनमचा पत्ता लागला नाही. त्यांनी पोलिसांकडे मदत मागितली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशBangladeshबांगलादेश