शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

अंगाचा थरकाप उडवणारी घटना; निर्दयी पोरानं बापाचं शिर धडापासून वेगळे केले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 12:58 IST

आरोपी मुलगा तितक्यावरच थांबला नाही तर त्याने वडिलांच्या मृतदेहावरील त्यांची शिर धडापासून वेगळे केले

गोरखपूर - उत्तर प्रदेशच्या गोरखपूर इथं खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका निर्दयी मुलाने बापाची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर शिर धडापासून वेगळे केले. मग मृतदेह एका ट्रॉली बॅगेत घालून रस्त्याशेजारी फेकून दिले. परंतु छोट्या भावाने हे सगळं पाहिले आणि त्यानं पोलिसांना घटनेबाबत कळवले. गोरखपूरच्या सूर्यकुंड परिसरात ही घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ९ वाजता ६२ वर्षीय मधूर मुरली गुप्ता यांचा मोठा मुलगा प्रिंस गुप्ता उर्फ संदीपने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. बाप-लेकांमध्ये पैशावरून वाद झाला होता. प्रिंस वडिलांकडून सातत्याने पैसे मागत होता. परंतु जेव्हा वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा रागाच्या भरात पोराने बापाची हत्या केली. 

इतकेच नाहीत आरोपी मुलगा तितक्यावरच थांबला नाही तर त्याने वडिलांच्या मृतदेहावरील त्यांची शिर धडापासून वेगळे केले. त्यानंतर एका ट्रॉलीत ते टाकून रस्त्यावर फेकून दिले. या घटनेनंतर रस्त्यात मधूर यांचा छोटा मुलगा प्रशांत रस्त्यात भेटला. त्याने प्रिंसला कुठे चाललाय विचारलं त्यावर त्याने काहीच उत्तर न देता स्कूटीवरून निघून गेला. 

प्रशांत जेव्हा घरी पोहचला तेव्हा रक्ताचे निशाण पाहिले. वडीलही घरात नव्हते घरातून ट्रॉलीही गायब होती. त्यामुळे प्रशांतला संशय आला त्याने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. तोपर्यंत प्रिंस घरी पोहचला. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी प्रिंसकडे वडीलांबाबत विचारणा केली. ज्यावर प्रिंसने वडिलांना ठार केल्याचं पोलिसांना सांगितले. हे ऐकताच पोलीसही हैराण झाले. आरोपीने सांगितले की, पप्पा, पैसे देत नव्हते म्हणून त्यांना मारले त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रिंसला अटक केली. पोलिसांनी प्रिंसने सांगितलेल्या ठिकाणी जात ट्रॉली ताब्यात घेतली. त्यानंतर मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. याबाबत पुढील तपास सुरू आहे असं पोलिसांनी म्हटलं.