शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:30 IST

ऑक्टोबर २०२४ रोजी आशाराणीला सासरच्या लोकांनी हाकलून दिल्याने ती मुलीला घेऊन रायचूरला आली होती. त्यानंतर आई वडिलांनी तिला थोड दिवस ठेवून घेतले

सोलापूर - पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सोलापूरातही सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने सोलापूर हादरलं आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील आशाराणी भोसले हिने जीवन संपवलं. या घटनेनंतर आशाराणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. कारसाठी पैशाची मागणी करत तिचा छळ केल्याचा आरोप  नातेवाईकांनी केला आहे.

चारचाकी वाहन घेण्याकरिता आणि इतर खर्चासाठी माहेरून पैसे घेऊन ये, तुला नीट स्वयंपाक करता येत नाही. नवऱ्याची इज्जत करत नाही असं म्हणून वारंवार मानसिक आणि शारिरीक त्रास देऊन तिचा छळ करण्यात आला. तिने त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. ऑक्टोबर २०२४ रोजी आशाराणीला सासरच्या लोकांनी हाकलून दिल्याने ती मुलीला घेऊन रायचूरला आली होती. त्यानंतर आई वडिलांनी तिला थोड दिवस ठेवून घेतले. सासरी असताना पतीने उलट आशाराणी हिच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. 

पहिली मुलगी, दुसरीला पाडले, तिसरीपूर्वीच आत्महत्या

आशाराणी हिला पहिली मुलगी झाली. सासरच्या लोकांना मुलगा हवा होता. मुलगी झाल्याने सासरच्या लोकांनी आशाराणी हिला त्रास देण्यास सुरुवात केली. दुसऱ्यावेळी प्रेग्नेंट असताना मुलगी आहे असं कळल्याने तिला ढकलून देऊन त्या बाळास संपवले. त्यानंतरही ती पुन्हा गर्भवती होती, ३ महिने झाले होते. पुन्हा मुलीचा संशय असल्याने सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पत्नी नांदण्यास येत नाही म्हणून पतीने तक्रार केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी आशाराणी हिस १० जानेवारी २०२५ रोजी घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर समुपदेशन केल्यानंतर दोघांनीही एकत्र नांदण्यास होकार दिला. त्यानंतर ३-४ महिन्यात ही घटना घडली असं नातेवाईकांनी म्हटलं.

११ फूट उंचीवर ती फाशी कशी घेऊ शकते?

आशाराणी हिने आत्महत्या केली नाही, तिचा खून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. ११ फूट उंचीवर ती फाशी कशी घेऊ शकते? दोरीला चार गाठी आहेत, तिच्या चेहऱ्यावर जखमा आहेत असे एक ना अनेक आरोप करत नातेवाईकांनी ही आत्महत्या नव्हे तर हत्याच असल्याचे माध्यमांना सांगितले. 

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेSolapurसोलापूर