शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

...तर त्यांना जेलऐवजी पुनर्वसन केंद्रात पाठवलं जातं; आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांचा जोरदार युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 17:39 IST

Aryan Khan Bail :पुढे रोहतगी म्हणाले, आता यापूर्वीचे काही संदर्भ जोडून आर्यन अमली पदार्थांचं सेवन करतो हे दाखवण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न सुरू आहे.

ठळक मुद्देNDPS कायद्यातही स्पष्ट केलंय की, ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी. त्यांना जेलऐवजी पुनर्वसन केंद्रात पाठवलं जातं असा युक्तिवाद रोहतगी यांनी हायकोर्टात केला.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. आर्यन खानच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे, या प्रतिज्ञापत्रामध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी त्याच्या बाजूने कोणताही व्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. हा सर्व राजकीय लोक आणि एनसीबीमधील मामला आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणीसाठी हायकोर्टात भारताचे माजी ऍटर्नी जनरल आणि जेष्ठ कायदेतज्ञ मुकूल रोहतगी कोर्टात पोहचले आणि रोहतगी आर्यनच्या जामिनासाठी युक्तिवाद करत आहेत. ज्यांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपांत पकडलं जात नाही, त्यांना अट्टल गुन्हेगारांप्रमाणे वागवणं चुकीचं आहे. NDPS कायद्यातही स्पष्ट केलंय की, ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी. त्यांना जेलऐवजी पुनर्वसन केंद्रात पाठवलं जातं असा युक्तिवाद रोहतगी यांनी हायकोर्टात केला. जर कमी प्रमाणात अमली पदार्थ सापडले असतील तर त्या आरोपीला जेलमध्ये टाकलं जात नाही. त्याला सुधारण्याची संधी दिली जाते. तर इथे आर्यनकडे काहीच सापडलेलं नाही आणि तरीही आर्यन २० दिवसांपासून तुरूंगात आहे असं रोहतगी यांनी हायकोर्टात म्हटलं.

आर्यनला गोवण्यासाठी एनसीबीनं साल 2018 पासूनच्या व्हॉट्सऍपचा संदर्भ जोडला आहे. या चॅटमधून काहीही सिद्ध होत नाही एनसीबीसाठी तो महत्त्वाचा पुरावा असेल मात्र त्याचा या घटनेशी कुठेही संबंध लागत नाही. आपण तिथं जाऊ, हे खाऊ, ते पिऊ या गोष्टी पुरावा कसा मानता येतील? असं रोहतगी यांनी युक्तीवादात म्हटलं आहे. एनडीपीएस कायद्यात अमली पदार्थ्यांच्या मात्रेलाही महत्व आहे. आर्यनकडे तर काहीच सापडलेलं नाही. मग त्याच्यावर या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कायद्यानं आरोपीकडे अमली पदार्थ सापडणं गरजेचं असतं, दुस-याकडे काय सापडलं त्याचा माझ्याशी काय संबंध? असा युक्तिवाद आर्यनच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी केला. एका पंचाचा कर्मचारी असलेल्या दुसऱ्या पंचाने इथल्या एनसीबी प्रमुखांवर गंभीर केले आहेत. हे सर्व प्रकरण एका राजकिय नेत्याच्या जावयाशी संबंधित आहे. मात्र आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, आमची केस गुणवत्तेच्याच आधारावर जामीनास पात्र असल्याचं रोहतगी हायकोर्टात म्हणाले.  

पुढे रोहतगी म्हणाले, आता यापूर्वीचे काही संदर्भ जोडून आर्यन अमली पदार्थांचं सेवन करतो हे दाखवण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यामुळे या घटनेतील आर्यन आणि अमली पदार्थांचा संदर्भ कसा जोडता येईल? असा सवाल रोहतगी यांनी उपस्थित केला.  आर्यननचा या हस्तगत केलेल्या अमली पदार्थांशी काहीही संबंध नसून त्याचा याच्या खरेदीतही कुठे संबंध असल्याचे पुरावे नाहीत. त्यानं यासाठी कुणालाही पैसे दिलेले नाहीत.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानHigh Courtउच्च न्यायालयNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थ