शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ जातीच्या स्टार बॅक कासवांची तस्करी; मीरारोडच्या स्थानिकाला अटक, म्होरक्या निसटला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 10:48 IST

एमएचबी कॉलनी पोलिसाची कारवाईस्टार बॅक कासवाची दक्षिण भारतात अधिक मागणी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: दुर्मिळ जातीचे स्टार बॅक कासव तस्करीप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी एकाला मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून असे २० कासव त्यांनी हस्तगत केले आहेत. घरात भरभराट येईल या अंधश्रध्देमुळे त्याची मागणी अधिक असल्याने या टोळीच्या अन्य साथीदारांचा शोध घेत या मुक्या वन्यजीवांची त्यांच्या पासून सुटका करण्याच्या प्रयत्नात सध्या पोलीस आहेत.

अटक तस्कराचे नाव हे नदीम शुजाउद्दीन शेख (३३) असून तो मीरा रोडचा रहिवासी आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी लोकमत ला दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर रोजी एमएचबी कॉलनी पोलिसांच्या हद्दीत काही लोक स्टार बॅक कासवाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांना मिळाली. त्यानुसार डॉ हिंडे यांनी पोलीस हवालदार घोडके व शिरसाट या पथकासह  बोरिवली पश्चिमच्या गणपत पाटील नगर , गल्ली क्रमांक ४ याठिकाणी सापळा रचला आणि शेख याला अटक केली. त्याच्याकडे त्यांना २० दुर्मिळ कासव सापडले ज्याची किंमत ३ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शेखवर आम्ही वन्यजीव संरक्षण कायदा १९७२  च्या कलम ९, ३९, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप समोर आली नसून त्याला हे कासव पुरविणाऱ्याचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी डॉ हिंडे यांनी सांगितले. 

भरभराटीसाठी लाखोंना विक्री !स्टार बॅक कासवाची दक्षिण भारतात अधिक मागणी आहे. हे कासव जवळपास १ मिटर पर्यंत हे मोठे होते. त्यामुळे ते घरात ठेवत त्याची जितकी वाढ तितकीच आपल्या घरात भरभराट, असा समज असल्याने २० हजार ते १ लाख रुपये मोजून देखील त्याची खरेदी केली जाते. तसेच अनैसर्गिक प्रजननही करण्याचे प्रकार होतात. 

म्होरक्या फरार...भारतीय हिमालयीन आणि उत्तर प्रदेशचे पहाडी पोपट तसेच मोरांची तस्करी या टोळीकडून करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार त्याच्या म्होरक्याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Smugglingतस्करी