शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

छर्रा गँगमधील आणखी सहा सराईत गुन्हेगारांना अटक!

By अनिल गवई | Updated: March 28, 2023 13:01 IST

यापूर्वी पथकाने शेगाव येथून टोळीतील छर्रा गँगमधील तिघांना अटक केली होती. 

खामगाव: येथील गांधी चौकात उभ्या दुचाकीतून साडेसहा लक्ष रुपयांची चोरीचा छडा लावताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आता आणखी सहा सराईत गुन्हेगारांना गुजरात येथून अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, यापूर्वी पथकाने शेगाव येथून टोळीतील छर्रा गँगमधील तिघांना अटक केली होती. 

गुजरात येथून दुचाकी, चारचाकीने येऊन एखाद्या शहरात मुक्काम ठोकून चोरी करण्याची पद्धत असलेल्या या आरोपींनी गांधी चौकातून एका दुचाकीच्या डिक्कीतून साडेसहा लाख रूपये लंपास केले होते. या चोरीचा छडा लावताना शेगावातून यापूर्वी तीन आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली. यातील तीन आरोपींना शनिवारी खामगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने उपरोक्त तिघांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात गाठले. अहमदाबाद येथील छर्रा नगर, कुबेर नगर, पावागड, वडोदरा, गोध्रा मधील डाकाेर येथे शोध घेऊन पथकाने शिताफिने त्यांचा पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना बुलढाणा येथे आणण्यात आले. आरोपींमध्ये सन्नी सुरेंद्र तमांचे (३५), दीपक धीरूभाई बजरंग (४०), मयूर दिनेश बजरंग (३९), राजेश ऊर्फ राकेश देवची तमांचे (४९), रवी नारंग गारंगे (५५), मुन्नाभाई मेहरूनभाईं इंदरेकर (६०) रा. छर्रा नगर अहमदाबाद गुजरात अशी आरोपींची नावे आहे.

पथकाचे परिश्रम यशस्वीजिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, खामगाव अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, बुलडाणा अपर पोलीस अधिक्षक बाबुराव महामुनी, खामगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे , सपोनि. राहूल जंजाळ, विलासकुमार सानप, पोउपनि संदीप सावले पोलीस अंमलदार गणेश किनगे, शरद गिरी, राजकुमार राजपूत, गजानन दराडे, केदार फाळके, अजीज परसूवाले, मधुकर रगड, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, वौभव मगर, विजय सोनोने, सुरेश भिसे, युवराज राठोड, गजानन गोरले, जगदेव टेकाळे, सतिष जाधव, दिगांबर कपाटे, सचिन जाधव तसेच सायबर पोलीस स्टेशनचे राजु आडवे, कैलास ठोंबरे यांनी यशस्वी केली. तपास पथकात सहा. पोलीस निरिक्षक विलासकुमार सानप, पो.ना. गणेश पाटील, पो.ना. युवराज राठोड, पो. कॉ. गजानन गोरले, पो.कॉ. विजय सोनोने, यांचा समावेश होता.

विविध गुन्ह्याचा तपासखामगाव शहर पोलीस स्टेशनसह पशि्चम विदर्भातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याचा तांत्रिक तपास करण्यात पोलीस यशस्वी झालेत. यात खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल भादंवि कलम ३७९, वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलीस स्टेशनमधील भादंवि कलम ३७९, यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल ३९२, ३४ आणि अकोला येथील जुने शहर पोलीस स्टेशनमधील भादंवि कलम ३७९ या गुन्ह्याचा समावेश असून महाराष्ट्रातील इतर गुन्ह्याचाही तांत्रिक तपास यशस्वी होणार असल्याचे समजते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी