शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दंगलप्रकरणी आणखी सहा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:37 IST

मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढल्यानंतर दंगल माजवणाऱ्यांपैकी वागळे इस्टेट पोलिसांनी आणखी पाच, तर नौपाडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे यातील अटक आरोपींची संख्या आता ५४ झाली आहे.

ठाणे : मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढल्यानंतर दंगल माजवणाऱ्यांपैकी वागळे इस्टेट पोलिसांनी आणखी पाच, तर नौपाडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे यातील अटक आरोपींची संख्या आता ५४ झाली आहे.सुरुवातीला या दंगल प्रकरणात नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव, निरीक्षक संजय धुमाळ आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या पथकाने शिवसेनेचे माजी नगरसेवक शरद कणसे यांच्यासह २३ जणांना, त्यापाठोपाठ पाच अशा २८ जणांना अटक केली होती. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण, पोलीस निरीक्षक सीताराम वाघ आणि संजय गायकवाड यांच्या पथकानेही सुरुवातीला राजेश बागवे या मनसे पदाधिकाºयासह १३ जणांना त्यापाठोपाठ सात अशा २० जणांना अटक केली. त्यानंतर, २८ जुलै रोजी नौपाडा पोलिसांनी संदीप यादव (रा. रामचंद्रनगर) याला अटक केली. वागळे इस्टेट पोलिसांनी आकाश जोशी (२६, रा. किसननगर), अनिकेत गावडे (१९, रा. लोकमान्यनगर, पाडा क्रमांक ४), आकाश साबळे (२६, शांतीनगर, वागळे इस्टेट), सुरेश पोळ (२५, रा. रामचंद्रनगर) आणि रमेश गायकवाड (२४, रा. मानपाडा, आझादनगर, ठाणे) या पाच जणांना अटक केली. त्यामुळे यातील अटक आरोपींची संख्या ५४ झाली आहे.बंद आणि आंदोलनादरम्यान हिंसक कारवाया करणाºयांवरच कारवाई केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. दरम्यान, आंदोलनानंतर अनेकांची धरपकड झाल्याने आरोपींच्या कुटुंबीयांनी सलग तिसºया दिवशीही नौपाडा पोलीस ठाण्यात विचारपूस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.कसून चौकशीया सहाही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. अटकेतील आरोपींच्या व्यतिरिक्त दंगलीशी संबंधित अनेकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यात तथ्य आढळल्यानंतरच आणखी आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायकगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Arrestअटकthaneठाणे