खैराची तस्करी करणारे सहा अटकेत; सुधागड तालुका वनविभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:10 AM2020-08-26T00:10:25+5:302020-08-26T00:10:50+5:30

वाहनांसह मुद्देमाल केला जप्त

Six arrested for smuggling Khaira; Action of Sudhagad taluka forest department | खैराची तस्करी करणारे सहा अटकेत; सुधागड तालुका वनविभागाची कारवाई

खैराची तस्करी करणारे सहा अटकेत; सुधागड तालुका वनविभागाची कारवाई

googlenewsNext

पाली : सुधागड तालुक्यात खैराच्या लाकडांची अवैध वाहतूक व तस्करी होण्याची प्रकरणे समोर येत आहेत. सोमवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास पाली-खोपोली राज्य महामार्गावर कानसळ गावाजवळ सुधागड वनविभागाच्या कारवाईत खैराच्या लाकडाची अवैध वाहतूक व तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात आले, तसेच या कारवाईत दोन वाहने व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उपवनसंरक्षक अलिबाग व सहायक वनसंरक्षक अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड समीर शिंदे, वनपाल खंडपोली बी.जी. दळवी वनरक्षक आर.पी टिके, एस.डी. शिंदे, एस.ए. डोंगरे, आर.जे. राक्षे, बी. एम. हाटकर, एस.व्ही. पोले, एम.एस पाटील, जे. एम. गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सोमवारी, २४ आॅगस्ट रोजी सुधागड वनक्षेत्रातील कानसळ गावाजवळ पाली-खोपोली मार्गावर गस्त करीत असताना, पहाटे ५.३० वाजता एका पिकअप वाहनामधून खैराची लाकडे एका ट्रकमध्ये भरत असल्याचे वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. खैर लाकडाबाबत पिकअप वाहनचालक नरेंद्र रघुनाथ वारंगे (तोरणपाडा) तालुका सुधागड यांच्याकडे विचारणा केली असता, खैर झाडाचे तुकडे ट्रक चालक निजाम हुसेन पटेल (राहणार चिपळूण) यांच्या सांगण्यावरून महागाव येथून आणल्याचे त्यांनी सांगितले. खैर लाकडाबाबत वनविभागाच्या वाहतूक परवाना घेतला आहे का? याबाबत विचारणा केली असता, तो नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला, तसेच पिकअप वाहन चालक नरेंद्र रघुनाथ वारंगे (रा. तोरणपाडा, ता. सुधागड), ट्रकचालक निजाम हुसेन पटई (रा. चिपळूण) बळीराम मारुती हिलम, बाळू गंगाराम पवार, नारायण धोंडू घोघरकर, रमेश भिकू हिलम सर्व राहणार भोप्याची वाडी यांना अटक केली आहे.

जप्त केलेला मुद्देमाल
या छाप्यात निळ्या रंगाची ताडपत्री असलेला ट्रक, त्यामधील २९ खैराच्या लाकडाचे तुकडे, पिकअप गाडी त्यामधील २७ खैराच्या लाकडाचे तुकडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Six arrested for smuggling Khaira; Action of Sudhagad taluka forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.