शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्टी प्रकरणी सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:56 IST

भार्इंदरची घटना : वकिलासही केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : भार्इंदर पश्चिमेस एका खाजगी जागेत बेकायदा हुक्का पार्टी करणाऱ्या एका वकिलासह एकूण सहा जणांना भार्इंदर पोलिसांनी छापा घालून अटक केली. विशेष म्हणजे या वकिलास पोलीस अधिकाऱ्यांनी सायबर गुन्ह्यात मदत केली म्हणून प्रशस्तिपत्र दिले होते. समाज माध्यमांवरही वकिलाने स्वत:चे पोलीस, नेत्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.भार्इंदर पश्चिमेच्या भोलानगर परिसरात नियमित हुक्का पार्टी चालत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भार्इंदर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने सोमवारी रात्री या ठिकाणी छापा मारला असता तेथे हुक्का पार्टी सुरू असल्याचे आढळले.पोलिसांनी गुन्हा दाखल करून अ‍ॅड. हर्ष राजेश शर्मा (२९), संजय बुदराज मुनोत (३३), पीयूष मित्तल (२८), भवरसिंह परमार (३२), अक्षय कोया (२६), राजदीप विमल दास (२२) या सहा जणांना अटक केली आहे. त्या ठिकाणी कायद्याने बंदी असलेल्या तंबाखूजन्य हुक्क्याची पार्टी सुरू होती. ही जागा कुणाच्या मालकीची व कोण सांभाळतो याची माहिती पोलीस घेत आहेत. शर्मा याला सायबर गुन्ह्यात मदत केली म्हणून अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, नयानगरचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी प्रशस्तिपत्रक दिले आहे.