शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

प्रेमाच्या आड येत होती लहान बहीण, तरूणीने बॉयफ्रेंडसोबत मिळून केलं धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 09:32 IST

Crime News : दोघांनीही पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांपासून ते फार काळ लपून राहू शकलं नाही. पोलिसांनी प्रेयसी आणि प्रियकराला अटक केली. 

Crime News : मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रियकरासोबतच्या नात्यात अडसर ठरत असलेल्या लहान बहिणीची मोठ्या बहिणीने हत्या केली. तिने प्रियकरासोबत मिळून लहान बहिणीची हत्या केली. दोघांनीही पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांपासून ते फार काळ लपून राहू शकलं नाही. पोलिसांनी प्रेयसी आणि प्रियकराला अटक केली. 

ही घटना साईखेडा येथील आहे. साईखेडा पोलिसांना हॉस्पिटलमधून सूचना मिळाली की, एका तरूणीचा संशयास्पद मृत्यू झालाय. पोलीस लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचले.  तरूणीला तिची बहीण आणि आई हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. कुटुंबियांनी सांगितलं की, तरूणी बाथरूममध्ये पडून मरण पावली. पण घटना संशयास्पद होती. त्यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू केली.

चौकशी दरम्यान पोलिसांना मृत तरूणीच्या मोठ्या बहिणीवर संशय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. पण तिने हत्या केल्याचं नाकारलं. पण जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा तिने सगळं सत्य सांगितलं. तिने पोलिसांना सांगितलं की, तिची मैत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये राहणाऱ्या राहुल सिंहसोबत झाली होती. हळूहळू दोघे प्रेमात पडले.

तिने पोलिसांना सांगितलं की, ती राहुल सिंहसोबत लग्न करणार होती. पण लहान बहीण शिखाला हे मान्य नव्हतं. अनेकदा समजावून सांगितलं तर ती ऐकत नव्हती. पोलिसांनी सांगितलं की, मोठी बहीण खूशबूच्या अनेक गोष्टी होत्या ज्यामुळे ती शिखाला कंटाळली होती. दोघींमध्ये सतत वाद होत होते. शिखाला मारण्यासाठी खूशबूने प्रियकराला सोबत घेतलं. ती त्याला म्हणाली की, जर माझ्यासोबत लग्न करायचं आहे तर त्याला शिखाची हत्या करावी लागेल.

राहुलने खुशबूचा हा प्रस्ताव स्वीकारला आणि अमेठीहून नरसिंहपूरच्या साईखेडा इथे आला. 22 फेब्रुवारीला तो साईखेडा इथे आला तेव्हा खुशबूने आईला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवलं. त्यानंतर तिने राहुलला घरी बोलवलं आणि शिखाची हत्या केली. दोघांनी आधी शिखाच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला आणि चाकूने तिच्यावर अनेक वार केले. त्यानंतर शिखा बाथरूममध्ये पडल्याची कहाणी रचली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी