शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच? आफताबला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 09:04 IST

आफताबला सुनावली १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जंगलात पोलिसांना सापडलेली हाडे श्रद्धा वालकर हिचीच असल्याचे न्यायसहायक प्रयोगशाळेतील डीएनए तपासणीत सिद्ध झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान आरोपी आफताबला शनिवारी  दिल्लीच्या न्यायालयाने १३ दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावली. आफताबला डॉ. आंबेडकर रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. रुग्णालयातूनच त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने न्यायालयात हजर करण्यात आले.

हत्येनंतर आफताबने एका डॉक्टर मुलीला आपल्या घरी डेटवर बोलावले होते, अशी माहिती समोर आली आहे. बम्बल डेटिंग ॲपवर यांची ओळख झाली होती. श्रद्धासोबतही त्याची ओळख याच ॲपवर झाली होती. ही डॉक्टर मुलगी घरी आली तेव्हा श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्येच होते. या डॉक्टर मुलीला दिल्ली पोलिसांनी शोधून काढले असून ती मानसोपचार तज्ज्ञ असल्याचे कळते. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जंगलात सापडलेल्या हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळत असल्याचे फोरेन्सिक तपासणीत आढळून आले आहे. आता पोलिसांना फोरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. 

सीबीआय चौकशीची पित्याची मागणीदरम्यान, श्रद्धाच्या हत्येची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी केली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, आफताब हा पोलिसांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी. श्रद्धाच्या हत्येत आफताबचा परिवारही सहभागी आहे. त्याच्या कारवाया त्याच्या आई-वडिलांना माहीत होत्या. तो श्रद्धाला मारहाण करतो, हे त्यांना माहीत होते. त्यांनी याची माहिती मला द्यायला हवी होती. तथापि, त्यांनी तसे केले नाही. त्याचे आई-वडीलही हत्येत सहभागी होते, हे मी दाव्यासह सांगतो. हत्येचे संपूर्ण सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCourtन्यायालय