शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

Shraddha Walker Murder Case : "मी आफताबला 15 वर्षांपासून ओळखतो पण तो..."; मित्राने केला मोठा खुलासा, श्रद्धाबद्दल म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 19:40 IST

Shraddha Walker Murder Case : आफताबच्या एका मित्राने आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे. निशंक मोदी असं या मित्राचं नाव असून त्याने विविध खुलासे केले आहेत.

‘लिव्ह इन पार्टनर’च्या खुनामुळे देश हादरलेला असतानाच या प्रकरणात आता अनेक कंगोरे पुढे येत आहेत. मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 

आफताबच्या एका मित्राने आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे. निशंक मोदी असं या मित्राचं नाव असून त्याने आजतकसोबत संवाद साधताना विविध खुलासे केले आहेत. आफताब एखाद्य़ा व्यक्तीची हत्या करेल याचा कधी विचारच केला नव्हता. त्यामुळे यावर विश्वास बसत नसल्याचं निशंकने सांगितलं. "मी आफताबला 15 वर्षांपासून ओळखतो. शाळा सुटल्यानंतर आम्ही एकत्र खेळायचो. त्याचा स्वभाव चांगला होता. त्याला खूप राग आलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं" असंही म्हटलं आहे. 

आफताब 2019 पासून विविध ठिकाणी वास्तव्यास असायचा. यानंतर आफताबचं कुटुंबदेखील दुसरीकडे राहायला गेलं, असं निशंक म्हणाला. आफताब आणि श्रद्धाच्या नात्याबद्दल मी ऐकलं होतं. ती आफताबच्या घरी जायची, हे मी ऐकून होतो. मात्र तिला कधीच पाहिलं नव्हतं. आफताब असा काही गुन्हा करेल याची कल्पनादेखील त्याला ओळखणाऱ्या कोणी केली नसेल, असंही निशंक मोदी याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'ते' 37 बॉक्स उलगडणार आफताबचं रहस्य; श्रद्धा हत्याकांडात नवा 'ट्विस्ट', नेमकं काय घडलं?

दिल्ली पोलिसांना या प्रकरणात महत्त्वाची माहिती मिळाली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी त्याने आपल्या वसई येथील घरातून 37 बॉक्स हे दिल्लीला पाठवले होते. या 37 बॉक्समध्ये नेमकं काय सामान होतं याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून त्याने बॉक्स दिल्लीला पाठवले होते. तसेच त्यासाठी पैसेही दिले होते. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने दिल्ली पोलिसांना सांगितले होते की, दिल्लीला जाण्यापूर्वी वसई भागातील त्यांच्या घरातून सामान नेण्यासाठी पैसे कोण देणार यावरून त्यांचे आणि श्रद्धाचे भांडण झाले होते. आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. गुडलक पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीच्या माध्यमातून आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी मुंबईहून दिल्लीला आपले सामान हलवले होते. 37 बॉक्समधून हे सामान दिल्लीला आणण्यात आलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर